महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

Former Nepal PM In India : नेपाळचे माजी पंतप्रधान पुष्पकमल दहल तीन दिवसांच्या भारताच्या दौऱ्यावर - former nepal pm pushpa k dahal

नेपाळचे माजी पंतप्रधान पुष्पकमल दहल ( Pushpa K Dahal IN Delhi ) आजपासून तीन दिवसांच्या भारत दौऱ्यावर ( Tour of India ) येत आहेत. दरम्यान, ते भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा, परराष्ट्र मंत्री एस जयशंकर ( External Affairs Minister S Jaishankar ) यांचीही भेट घेणार आहेत.

former nepal pm
former nepal pm

By

Published : Jul 15, 2022, 2:07 PM IST

नई दिल्ली -भारताच्या तीन दिवसांच्या दौऱ्यासाठी ( Tour of India ) नेपाळचे माजी पंतप्रधान पुष्पकमल दहल ( Pushpa K Dahal IN Delhi ) आज राजधानी दिल्लीत दाखल होत आहेत. दरम्यान, ते भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा, परराष्ट्र मंत्री एस जयशंकर ( External Affairs Minister S Jaishankar ) यांचीही भेट घेणार आहेत.

भाजपचे निमंत्रण - भाजपचे परराष्ट्र व्यवहार विभागाचे प्रभारी डॉ. व्ही चौथुवाला यांनी वृत्तसंस्थेला सांगितले की, नेपाळचे माजी पंतप्रधान पुष्पा दहल आज दुपारी दिल्लीला पोहोचत आहेत. 'भाजपला जाणून घ्या' मोहिमेचा एक भाग म्हणून भाजपच्या अधिकृत निमंत्रणावरून ते 17 जुलै रोजी पक्ष कार्यालयात भाजप अध्यक्ष जेपी नड्डा यांची भेट घेणार आहेत. यावेळी भाजपचे वरिष्ठ नेते उपस्थित राहणार आहेत. ते परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांचीही भेट घेणार असल्याचे वृत्त आहे.

'भाजपला जाणून घ्या' अभियान 6 एप्रिलपासून सुरू झाले आहे. याअंतर्गत विदेशी मुत्सद्दी पक्षाच्या नेत्यांची ओळख करून दिली जाते आणि त्यांना भाजपची विचारधारा आणि इतिहासाची जाणीव करून दिली जाते. भाजपच्या मुख्यालयात नेपाळी नेत्याची ही दुसरी भेट आहे. तत्पूर्वी, पंतप्रधान शेर बहादूर देउबा यांनी त्यांच्या मंत्र्यांसह जेपी नड्डा आणि पक्षाच्या इतर नेत्यांची भेट घेतली.

हेही वाचा -Jayant Patil On Shinde Government : 'कुणाला खाती द्यायची, कुणाचे किती मंत्री घ्यायचे यातच यांचा वेळ जातोय' - जयंत पाटील

ABOUT THE AUTHOR

...view details