महाराष्ट्र

maharashtra

राष्ट्रवादीला मोठा झटका.. माजी खासदाराने दिली सोडचिठ्ठी.. 'या' पक्षात केला प्रवेश.. समीकरणे बदलणार..?

राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी नेते आणि प्रसिद्ध वकील माजीद मेमन EX MP Majeed Memon यांनी तृणमूल काँग्रेसमध्ये प्रवेश केला Former NCP MP Majeed Memon joins TMC आहे. आज त्यांनी पक्षाचे औपचारिक सदस्यत्व स्वीकारले. ते भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याची चर्चा होती.

By

Published : Dec 14, 2022, 3:27 PM IST

Published : Dec 14, 2022, 3:27 PM IST

Updated : Dec 14, 2022, 3:37 PM IST

राष्ट्रवादीचे माजी खासदार मजीद मेमन यांचा टीएमसीमध्ये प्रवेश
राष्ट्रवादीचे माजी खासदार मजीद मेमन यांचा टीएमसीमध्ये प्रवेश

नवी दिल्ली- राष्ट्रवादीचे माजी खासदार मजीद मेमन EX MP Majeed Memon यांनी पक्षाचे खासदार डेरेक ओब्रायन MP Derek O Brien आणि सौगता रॉय Saugata Roy यांच्या उपस्थितीत टीएमसीमध्ये प्रवेश Former NCP MP Majeed Memon joins TMC केला. राष्ट्रवादीचे माजी नेते माजीद मेमन यांनी तृणमूल काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे.

महाराष्ट्रातून ते राज्यसभेवर खासदार राहिले आहेत. ते पेशाने वकील असून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या प्रमुख नेत्यांमध्ये त्यांचा समावेश होता. फौजदारी वकील म्हणून त्यांना खूप प्रसिद्धी मिळाली. त्यांनी अनेक प्रसिद्ध राजकारणी, मानवाधिकार कार्यकर्ते आणि चित्रपट कलाकारांसह भारतीय व्यक्तिमत्त्वांचा न्यायालयात बचाव केला आहे. त्याने विविध प्रत्यार्पण प्रकरणांमध्ये परदेशात उच्च प्रोफाइल असलेल्या भारतीयांची बाजू न्यायालयात मांडलेली आहे. मेमन हे मानवाधिकार कार्यकर्ते देखील आहेत.

मेमनने मुंबईतील 1993 च्या साखळी बॉम्बस्फोटातील अनेक संशयितांचेही प्रतिनिधित्व केले आहे. काही दिवसांपूर्वी माजीद मेमन यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे कौतुक केले होते. पीएम मोदींबद्दल ट्विट करताना त्यांनी लिहिले की, 'जे गुण पीएम मोदींमध्ये आहेत ते विरोधी नेत्यांमध्ये नाहीत.

नरेंद्र मोदी जर जनतेची मते जिंकून जगातील सर्वात लोकप्रिय नेते म्हणून दाखवले जात असतील, तर त्यांच्यात काही चांगले गुण असावेत किंवा त्यांनी चांगली कामे केली असावीत, जी विरोधी नेत्यांनी केली नाहीत. मात्र, नंतर त्यांनी आपले म्हणणे मागे घेतले. त्यांच्या या वक्तव्यानंतर ते भाजपमध्ये प्रवेश करतील अशी शक्यता वर्तवली जात होती.

Last Updated : Dec 14, 2022, 3:37 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details