भोपाल (म.प्र) - माजी केंद्रीय मंत्री उमा भारती या वादग्रस्त वक्तव्य करून चर्चेत आल्या आहेत. त्यांनी नोकरशाहीला अस्वीकार करत, ती काही नसून नेत्यांची चप्पल उचलणारी असते, अशी टीका केली. त्याचबरोबर, नोकरशाहीद्वारे नेत्यांना फिरवले जाते, या प्रश्नावर विचारले असता, या फालतू गोष्टी आहेत, नोकरशाहीची योग्यता काय आहे? नोकरशाही नेत्यांना फिरवत नाही तर, एकट्यात चर्चा होते, त्यानंतर पुन्हा नोकरशाही फाइल बनवून घेऊन येते, असे उमा भारती म्हणाल्या.
प्रतिक्रिया देताना भाजप नेत्या उमा भारती हेही वाचा -दिव्यांगांकरिता घरोघरी लसीकरण करण्याबाबत सर्वोच्च न्यायालयाची केंद्राला नोटीस
आरक्षण घेऊनही काय करणार? सगळे काही खासगी केले जात आहे
राज्यात ओबीसीला 27 टक्के आरक्षण देण्याच्या मुद्द्यावर सुरू असलेल्या वादावर उमा भारती म्हणाल्या, सरकारी नोकऱ्यांमध्ये आरक्षण घेऊनही काय करणार? सरकारीमध्ये काही शिल्लकच राहात नाही, सगळे काही खासगी केले जात आहे, मग अशात तुम्ही सर्वांनी खासगी क्षेत्रात आरक्षणाची मागणी केली पाहिजे, तेव्हाच काही कल्याण होईल. त्याचबरोबर, एकच देवता आणि एकच पूजेच्या पद्धतीव्यतिरिक्त बेटी-रोटीनेच तुमची ताकत वाढेल, असा सल्ला उमा भारती यांनी दिला.
दारूबंदीमध्ये सुधार झाला नाही तर..
नुकतेच उमा भारती यांनी दारूबंदीच्या मुद्द्यावर शिवराज सरकारला ताकीद दिली आहे. ज्यावेळी जबलपूरमध्ये केंद्रीय गृहमंत्री अमित शहांबरोबर मुंख्यमंत्री शिवराज सिंह चौहान आदिवासींना आकर्षित करण्याचा प्रयत्न करत होते, त्यावेळी भोपालमध्ये उमा भारती शिवराज सरकारविरोधात मोर्चा उघडण्याची घोषणा करत होत्या. त्यांनी स्पष्ट केले की, त्या 15 जानेवारी नंतर रस्त्यावर उतरणार, कारण मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान आणि प्रदेश अध्यक्ष वीडी शर्मा यांनी जनजागृतीसाठी 6 महिन्यांचा वेळ दिला आहे. त्यानंतर दारूबंदीमध्ये सुधार झाला नाही तर, त्या डंडा घेऊन रस्त्यावर उतरणार.
हेही वाचा -दलित नेते चरणजित सिंह चन्नी यांनी घेतली पंजाबच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ