रांची - पॉर्न व्हिडिओ तयार करण्याचा आरोप असलेला उद्योगपती राज कुंद्रा आणखी अडचणीत सापडला आहे. झारखंडमधील मॉडल आणि माजी मिस इंडिया युनिव्हर्सनेही राज कुंद्रावर गंभीर आरोप केला आहे. कोल्ड ड्रिंकमध्यये अमली पदार्थ टाकून कुंद्राच्या प्रॉडक्शन हाऊसने पॉर्न व्हिडिओ तयार केल्याचा आरोप या मॉडेलने कुंद्रावर केला आहे.
माजी मिस इंडिया युनिव्हर्स म्हणाली, की मी एक मॉडेल आहे. मॉडेल होण्यासाठी मुंबईमध्ये कामासाठी आले होते. तेव्हा मला कोल्ड ड्रिंक्समध्ये अमली पदार्थ टाकून देण्यात आले. त्यानंतर पॉर्न व्हिडिओ तयार करण्यात आला. हे मला कळताच मी मुंबई पोलिसात तक्रार दाखल केली. त्याबाबत मुंबई पोलिसात तपास सुरू आहे.
राज कुंद्राच्या प्रोडक्शन हाऊसने फसवून तयार केले पॉर्न व्हिडिओ हेही वाचा-सायरा बानू यांचा अँजिओग्राफीला नकार, दिलीप कुमार यांच्या मृत्यूने नैराश्य
सासरकडील लोकांनी हुंड्याची मागणी केली. त्यांना नकार दिल्यानंतर 16 जुलैला मला मारहाण करण्यात आली. पतीसह इतरांविरोधात कतरास ठाण्यात तक्रार केली आहे. मुंबईमध्ये मुलींना धोका देऊन त्यांचा व्हिडिओ तयार करणारी टोळी आहे. ही टोळी मुलींचे व्हिडिओ व्हायरल करते. या प्रकरणात पीडिता असल्याचे या मॉडेलने म्हटले आहे. न्याय मिळण्यासाठी मालवानी ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
हेही वाचा-#SidNaaz: एका फायरब्रँड लव्ह स्टोरीचा काळीज पिळवटणारा अंत
राज कुंद्राच्या पॉर्न फिल्ममध्ये काम केल्याचा नातेवाईकांचा मॉडेलवर आरोप
पती तुरुंगात गेल्यानंतर त्याच्या मोठ्या भावाने आणि आईने मॉडेल सुनेवर गंभीर आरोप केले आहेत. या सुनेने राज कुंद्राच्या पॉर्न फिल्ममध्ये काम केल्याचा त्यांचा दावा आहे. या सुनेने दोन विवाह केल्याचा आरोप मॉडलेच्या दीराने केला आहे. महिला असल्याचा ती गैरफायदा घेत असल्याचा आरोपही या दीराने केला आहे.
हेही वाचा-शाहीर साबळे यांचा नातू केदार शिंदे घेऊन येतोय चित्रपट ‘महाराष्ट्र शाहीर'!
पती तुरुंगात, प्रकरणाचा पोलिसाकडून तपास सुरू-
जिल्हा पोलीस उपअधीक्षक कुमार पांडेय म्हणाले, की मॉडेलच्या तक्रारीनंतर पती आणि सासरच्या लोकांविरोधात कतरास ठाण्यात हुंडाबंदी कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मॉडेलच्या पतीची न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्यात आली आहे.
काय आहे नेमके प्रकरण -
राज कुंद्रा हा पोर्नोग्राफी प्रकरणातील मुख्य सूत्रधार मानला जात आहे. राज कुंद्राची व्हिआन नावाची कंपनी असून तिचे केनरीन नावाच्या कंपनीसोबत टायअप होते. केनरीन ही कंपनी लंडन स्थित आहे. राज कुंद्राच्या भावोजींच्या मालकीची ही कंपनी आहे. त्याचे हॉट शॉट्स नावाचे एक अॅप होते. या कंपनीच्या सर्व कन्टेन्टची निर्मिती, या अॅपचे ऑपरेशन्स, अकाउंटिंग राज कुंद्राच्या मालकीच्या व्हिआन या कंपनीच्या मुंबईतील ऑफिसमधूनच होत होते. या प्रकरणाचा सखोल तपास करीत असताना हे सर्व धागेदोरे सापडले आहेत. यामध्ये काही व्हॉट्सअप ग्रुप, ई-मेल्स, अकाऊंट शीट्स सापडल्या आहेत. मुंबई पोलिसांच्या प्रॉपर्टी सेलने पोर्नोग्राफी तयार करण्याच्या गुन्ह्यात राज कुंद्रासह 11 आरोपींना अटक केली आहे.