महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

Eshwarappa on Azaan :'अजान'वर भाजप नेते के ईश्वरप्पा यांचे वादग्रस्त विधान - भारतीय जनता पक्षाचे आमदार के ईश्वरप्पा

भाजप आमदार के ईश्वरप्पा यांनी अजानवरून एक विवादास्पद विधान केले आहे, ज्यावरून मोठा वाद निर्माण होऊ शकतो. ते म्हणतात जीथे जावे तीथे अजानचा त्रास होतो. अशा आशयाचे विधान केले आहे.

Eshwarappa on Azaan
Eshwarappa on Azaan

By

Published : Mar 13, 2023, 7:05 PM IST

बेंगळुरू (कर्नाटक): भारतीय जनता पक्षाचे आमदार के ईश्वरप्पा यांनी पुन्हा एकदा वादग्रस्त विधान केले आहे. ते म्हणाले की, जिथे जावे तिथे अजानचा त्रास होतो. तसेच, सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर हे सर्व नक्कीच संपेल असही ते म्हणाले आहेत. दरम्यान, अशा पद्धतीचे ईश्वरप्पा यांनी यापूर्वीही प्रक्षोभक आणि आक्षेपार्ह विधाने केली आहेत. ईश्वरप्पा मंगळुरूमध्ये एका जाहीर सभेला संबोधित करत होते त्यावेळी ते बोलत होते.

धर्माचे रक्षण करणारी ती भारतमाता आहे : ईश्वरप्पा यांनी मंगळुरू येथे हे वक्तव्य केले. ते म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सर्व धर्मांचा आदर करण्याबाबत सांगितले आहे. परंतु, मला एक कळत नाही की स्पीकरचा वापर केला तरच अल्लाह अजान ऐकतो का? असा प्रश्न ईश्वरप्पा यांनी उपस्थित केला आहे. तसेच, ते पुढे म्हणाले की, हिंदूही मंदिरात पूजा करतात. मात्र, अशा पद्धतीने होत नाही. आणि हिंदू पुजेवर आमचा तिच्यावर पूर्ण विश्वास आहे, धर्माचे रक्षण करणारी ती भारतमाता आहे असही ते म्हणाले आहेत.

काही दिवसांपूर्वी टिपू सुलतानबद्दल आक्षेपार्ह विधान केले होते : ईश्वरप्पा म्हणाले की, स्पीकरचा वापर केला तरच अल्लाह ऐकतो का? हे चुकीचे असून हे स्पीकर वापरणे बंद झाले पाहिजे. तसेच, या समस्येचे निराकरण केले पाहिजे असही ते म्हणाले आहेत. ईश्वरप्पा मंगळुरूमध्ये एका जाहीर सभेला संबोधित करत होते. यादरम्यान त्यांनी अजान ऐकली. त्यानंतर त्यांनी ही टिप्पणी केली. तसेच, याआधीही ईश्वरप्पा अनेक प्रसंगी अशी विधाने करत आहेत, त्यामुळे वाद निर्माण झाला आहे. त्यांनी काही दिवसांपूर्वी टिपू सुलतानबद्दल आक्षेपार्ह विधान केले होते. टिपू सुलतानसाठी त्यांनी 'मुस्लिम गुंड' असा शब्द वापरला होता.

मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा लागला : काही महिन्यांपूर्वी एका कंत्राटदाराने ईश्वरप्पा यांच्यावर गंभीर आरोप केले होते. त्या ठेकेदाराने आत्महत्या केल्याचा आरोप आहे. त्यांनी आपल्या मृत्यूला ईश्वरप्पा जबाबदार असल्याचे सांगितले होते. या घटनेनंतर ईश्वरप्पा यांना मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा लागला होता.

हेही वाचा :Hasan Mushrif Moves HC : ईडीविरोधात हसन मुश्रीफांची मुंबई उच्च न्यायालयात धाव; खटला रद्द करण्याची मागणी

ABOUT THE AUTHOR

...view details