महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

Dr Harshvardhan left ceremony : ...म्हणून माजी मंत्री हर्षवर्धन दिल्लीमधील शपथविधी सोहळ्यातून रागाने पडले बाहेर - भाजप खासदार डॉ हर्षवर्धन

माजी केंद्रीय मंत्री डॉ. हर्षवर्धन ( Former Union Minister Dr Harshvardhan  ) हे दिल्लीचे नवे नायब राज्यपाल विनय कुमार सक्सेना यांच्या शपथविधी सोहळ्यात ( swearing ceremony Deputy Governor of Delhi ) हजर राहिले. मात्र शपथविधी सोहळ्यात खासदारासाठी जागाही ठेवली नाही, असे सांगून ते निघून गेले. खासदाराचे मन वळवण्यासाठी अधिकारी गेटपर्यंत गेले. पण, अधिकाऱ्यांना डॉ. हर्षवर्धन यांचे मन ( Harshvardhan left ceremony ) वळविता आले नाही.

माजी मंत्री हर्षवर्धन
माजी मंत्री हर्षवर्धन

By

Published : May 26, 2022, 5:26 PM IST

नवी दिल्ली- दिल्लीचे नवे नायब राज्यपाल विनय कुमार सक्सेना यांनी ( Deputy Governor Vinay Kumar Saxena ) पद आणि गोपनीयतेची शपथ ( Vinay Kumar Saxena took oath of office ) घेतली. शपथविधी सोहळ्यात एक विचित्र किस्सा पाहायला मिळाला. माजी केंद्रीय मंत्री आणि भाजप खासदार डॉ. हर्षवर्धन दिल्लीच्या नवीन नायब राज्यपालांच्या शपथविधी सोहळ्याला हजर राहण्यासाठी आले ( BJP MP Dr Harshvardhan angry in program ) होते. मात्र सोहळ्यात बसण्याची व्यवस्था नसल्याने संतप्त होऊन बाहेर पडले.

माजी केंद्रीय मंत्री डॉ. हर्षवर्धन ( Former Union Minister Dr Harshvardhan ) हे दिल्लीचे नवे नायब राज्यपाल विनय कुमार सक्सेना यांच्या शपथविधी सोहळ्यात ( swearing ceremony Deputy Governor of Delhi ) हजर राहिले. मात्र शपथविधी सोहळ्यात खासदारासाठी जागाही ठेवली नाही, असे सांगून ते निघून गेले. खासदाराचे मन वळवण्यासाठी अधिकारी गेटपर्यंत गेले. पण, अधिकाऱ्यांना डॉ. हर्षवर्धन यांचे मन ( Harshvardhan left ceremony ) वळविता आले नाही. ते तावातावाने समारंभ सोडून निघून गेले.

माजी मंत्री हर्षवर्धन दिल्लीमधील शपथविधी सोहळ्यातून रागाने पडले बाहेर

राज्यपालांकडे करणार तक्रार-या घटनेबाबत भाजप खासदार डॉ.हर्षवर्धन म्हणाले की, या गैरकारभाराची तक्रार उपराज्यपालांकडे करणार आहे. यासंदर्भात मी विनय कुमार सक्सेना यांना पत्र लिहिणार असल्याचे त्यांनी सांगितले. माजी केंद्रीय मंत्री डॉ. हर्षवर्धन यांनी शपथविधी सोहळ्यातून बाहेर पडल्यानंतर अनेक सोफे कार्यक्रमस्थळी आणण्यात आले.

नायब राज्यपाल अनिल बैजल यांचे दिल्ली सरकारशी उडाले सतत खटके-यापूर्वी असलेले नायब राज्यपाल अनिल बैजल यांनी दिल्ली विकास प्राधिकरणासह अनेक खात्यांमध्ये महत्त्वाच्या पदांवर काम केले आहे. दिल्ली सरकार आणि लेफ्टनंट गव्हर्नर यांच्यात अनेकदा संघर्ष झाला. दिल्ली सरकारच्या महत्त्वाकांक्षी योजनांपैकी एक म्हणजे घरोघरी रेशन या निर्णयावरुन लेफ्टनंट गव्हर्नर आणि दिल्ली सरकार यांच्यात संघर्ष झाला. या योजनेबाबत दिल्ली सरकारने सांगितले होते की, फोन कॉलद्वारे लाभार्थींना ज्या पद्धतीने पिझ्झा वितरित केला जातो. त्याचप्रमाणे लाभार्थ्याला रेशनही कोणतीही अडचण न येता देण्यात यावे, मात्र दिल्लीचे नायब राज्यपाल अनिल बैजल यांनी मंत्रिमंडळाकडून या योजनेला मंजुरी मिळूनही योजनेची फाईल फेटाळली होती.

हेही वाचा-मैसूर येथील शाळेत विद्यार्थ्यांना शिकवण्यासाठी चक्क रोबोट टीचर, हे आहे वैशिष्ट्य

हेही वाचा-justice for his sister : बहिणीचा सासरी छळ होत असल्याने भावाचा संघर्ष ; आंध्र ते दिल्ली बैलगाडीने प्रवास करत सर्वोच्च न्यायालयात मागणार दाद

हेही वाचा-MODI Hyderabad Tour: घराणेशाही असणारे पक्षच स्वत:ची तिजोरी भरतात- पंतप्रधान मोदींची विरोधकांवर टीका

ABOUT THE AUTHOR

...view details