महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

केरळात काँग्रेसला धक्का; विजयन थॉमस यांचा भाजपात प्रवेश - विजयन थॉमस यांचा भाजपात प्रवेश

विजयन थॉमस यांनी काँग्रेसला रामराम ठोकत भाजपामध्ये प्रवेश केला आहे. केरळ विधानसभेत 140 जागांसाठी 6 एप्रिलला मतदान होणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात भाजपा सरकारने राबवलेल्या योजनांनी विजय थॉमस प्रभावीत झाल्याचे भाजपा नेते अरुण सिंग यांनी म्हटलं.

विजयन थॉमस
विजयन थॉमस

By

Published : Mar 13, 2021, 9:05 AM IST

नवी दिल्ली - केरळमध्ये विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू असून राजकीय घडामोडींनी वेग घेतला आहे. विजयन थॉमस यांनी काँग्रेसला रामराम ठोकत भाजपामध्ये प्रवेश केला आहे. राज्याच्या दक्षिण भागातील ख्रिश्चन धर्मीय मतदारांना आकर्षित करण्यासाठी भाजपाने विजयन थॉमस यांना आपल्या गटात घेतले. केरळ विधानसभेत 140 जागांसाठी 6 एप्रिलला मतदान होणार आहे.

पक्षाचे नेतृत्व वास्तविक परिस्थितीपासून अनभिज्ञ आहे. तत्वे असेलेल्या व्यक्तीने पक्षात राहणे, फार कठिण आहे, असे थॉमस म्हणाले. दरम्यान विधानसभा निवडणुकीमध्ये त्यांना काँग्रेसकडून तिकीट नाकारण्यात आले आहे. त्यामुळेही ते भाजपच्या गोटात सामील झाले असावे, असे बोलले जात आहे. दरम्यान 2019 च्या लोकसभा निवडणुकीदरम्यान थॉमस भाजपामध्ये सहभागी होणार असल्याच्या चर्चांना उधाण आले होते.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात भाजपा सरकारने राबवलेल्या योजनांनी विजय थॉमस प्रभावीत झाल्याचे भाजपा नेते अरुण सिंग यांनी म्हटलं.

केरळ विधानसभा निवडणूक -

केरळ विधानसभा निवडणूक 2016 मध्ये पार पडली. 16 मे 2016 रोजी एकाच फेरीत घेण्यात आलेल्या या निवडणुकीमध्ये केरळ विधानसभेमधील सर्व 140 जागांसाठी आमदार निवडले गेले. मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या नेतृत्वाखालील डाव्या आघाडीने 91 जागांवर विजयासह संपूर्ण बहुमत मिळवले व काँग्रेस पक्षाची सत्ता संपुष्टात आणली. या निवडणुकीत प्रथमच भाजपाला केरळमध्ये एका जागेवर विजय मिळाला. तर आता येत्या 6 एप्रिलला मतदान होईल. तर निवडणुकीचे निकाल 2 मे 2021 ला लागतील.

भाजपाचे आव्हान -

सध्या केरळात माकपाच्या नेतृत्वात डावे पक्ष सत्तारुढ आहेत. सत्तेत येण्यासाठी भाजपाकडूनही जोरदार तयारी सुरू आहे. ‘मेट्रोमॅन’ ई. श्रीधरन यांची देशभरात ख्याती आहे. त्यामुळे त्यांचा फायदा भाजपाला होईल, असे दिसते. डाव्या आघाडीविरोधात भाजपा, कोरोना महामारीतील अपयश, ‘लव्ह जिहाद’ आणि शबरीमला हे मुद्दे उपस्थित करू शकते. एकूणच या निवडणुकीमध्ये केरळचे राजकारण ढवळून निघणार आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details