महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

फारुख अब्दुल्ला रुग्णालयात दाखल; काही दिवसांपूर्वी झाला होता कोरोना - फारुख अब्दुल्ला कोरोनाची लागण

जम्मू-काश्मीरचे माजी मुख्यमंत्री फारूक अब्दुल्ला यांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यामुळे उपचारासाठी त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. फारूक अब्दुल्ला यांना कोरोनाची लागण झाल्याचे त्यांचा मुलगा ओमर अब्दुल्ला यांनी ट्वीट करून सांगितले.

फारुख अब्दुल्ला
फारुख अब्दुल्ला

By

Published : Apr 3, 2021, 5:38 PM IST

श्रीनगर - देशभरामध्ये कोरोनाचे प्रसार होत असून रुग्णांच्या संख्येत पुन्हा वाढ होत आहे. जम्मू-काश्मीरचे माजी मुख्यमंत्री फारूक अब्दुल्ला यांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यामुळे उपचारासाठी त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. फारूक अब्दुल्ला यांना कोरोनाची लागण झाल्याचे त्यांचा मुलगा ओमर अब्दुल्ला यांनी ट्वीट करून सांगितले.

ओमर अब्दुल्ला यांचे टि्वट

फारूक अब्दुल्ला यांना अधिक चांगल्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे, असे टि्वट ओमर अब्दुल्ला यांनी केले आहे. देखरेखीसाठी डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार श्रीनगर येथील कुटुंबातील सर्वच सदस्य होम आयसोलेशनमध्ये आहेत. गेल्या काही दिवसांत आमच्या संपर्कात आलेल्या सर्वांनी कोरोनाची चाचणी करुन घ्यावी, असे आवाहनही ओमर अब्दुल्ला यांनी केले आहे.

फारूक अब्दुल्ला पंजाबचे मुख्यमंत्री अमरिंदर सिंह यांच्याबरोबर बॉलिवूडच्या जुन्या गाण्यावर थिरकताना

विशेष म्हणजे काही आठवड्यांपूर्वी फारूक अब्दुल्ला यांना एका सार्वजनिक कार्यक्रमात नाचताना पाहायला मिळाले होते. पंजाबचे मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंह यांची नात सहर सिंह हिच्या लग्नाला फारूक अब्दुल्ला यांनी हजेरी लावली होती. लग्नाच्या निमित्ताने कॅप्टन अमरिंदर सिंह यांच्याबरोबर बॉलिवूडच्या जुन्या गाण्यावर दोघेही थिरकताना पाहायला मिळाले होते. यासंबंधित त्यांच व्हिडिओ व्हायरल झाला होता. पंजाबचे महाधिवक्ता अतुल नंदा आणि कॅबिनेट मंत्री राणा गुरमीतसिंग सोधी हेही फारूक अब्दुल्ला यांच्यासमवेत नाचताना दिसले.

कोरोनाचा वाढता प्रसार -

नुकतचं भारताचे माजी पंतप्रधान एच. डी. देवेगौडा आणि त्यांच्या पत्नी चेनम्मा यांना कोरोनाची लागण झाली आहे. तसेच अभिनेत्री आलिया भटला कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले आहे. कोरोनाची सातत्याने वाढणारी रुग्णसंख्या आणि वाढणारे मृत्यूचे प्रमाण प्रशासनाच्या चिंतेत भर घालणार आहे. कोरोनाचा वाढता प्रसार पाहता नागरिकांना काळजी घेण्याचे आवाहन केले जात आहे.

हेही वाचा -दाऊदचा हस्तक दानिश चिकनाला न्यायालयात केलं हजर; पाच दिवसांची पोलीस कोठडी

ABOUT THE AUTHOR

...view details