लखनौ -सर्वोच्च न्यायालयाच्या बाहेर बलात्कार पीडितेने जाळून घेतल्याच्या घटनेत पोलिसांनी माजी आयपीएस अधिकारी अमिताभ ठाकूर यांना अटक केली आहे. एसआयटी चौकशीनंतर हजरतगंज पोलिसांनी हजरतगंज न्यायालयात माजी आयपीएस अमिताभ ठाकूर आणि बसपा खासदार अतुल राय यांच्यावर शुक्रवारी गुन्हा दाखल केला आहे.
पोलिसांनी अटक केल्याची माहिती माजी आयपीएस अधिकारी अमिताभ ठाकूर यांनी ट्विट करून दिली आहे. पीडितेला आत्मदहन करण्यास प्रवृत्त करणे, गुन्ह्याचा कट रचणे आणि कारस्थान करून कागदपत्रे बनविणे या आरोपाखाली अमिताभ ठाकूर यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अमिताभ ठाकूर यांनी शुक्रवारी (आज) सकाळी अधिकार सेना या नावाच्या पक्षाची स्थापना केली होती. पोलिसांनी ठाकूर यांना घरात नजरकैदेत ठेवले होते.
हेही वाचा-कोडरमा औष्णिक प्रकल्पात लिफ्ट कोसळल्याने चार जणांचा मृत्यू; मृतामध्ये महाराष्ट्राचे दोन
चौकशी समितीच्या तपासानंतर अटकेत होते अमिताभ ठाकूर
दिल्लीमधील सर्वोच्च न्यायालयाबाहेर बलात्कार पीडिता आणि त्याच्या मित्राने आत्महत्येचा प्रयत्न केला होता. दोघांनीही लाईव्ह व्हिडिओमध्ये बसपा खासदार अतुल रायवर बलात्काराचा आरोप केला होता. तर खासदाराच्या इशाऱ्यावरून अमिताभ ठाकूर यांनी त्रास दिल्याचा आरोप केला होता. त्यानंतर मुख्यमंत्र्यांनी आदेश देऊन प्रकरणाचा तपास नीरा राव आणि आर. के. विश्वकर्मा यांच्याकडे सोपविला होता. चौकशी समितीने दोन आठवड्यांमध्ये सरकारने अहवाल सादर केला आहे. चौकशी समितीने गोरखपूरला जाणाऱ्या अमिताभ ठाकूर यांना 23 ऑगस्टला अटक करून घरात नजरकैदेत ठेवले होते.