ऊना (हिमाचल प्रदेश) - भारतीय हॉकीचे माजी कर्णधार चरणजीत सिंह यांचे निधन ( Charanjit Singh passes away ) झाले आहे. ऑलिम्पिक सुवर्णपदक विजेत्या भारतीय हॉकी संघाचे कर्णधार असलेले अर्जुन पुरस्कार विजेते आणि पद्मश्री चरणजीत सिंह यांनी उना येथील राहत्या घरी पहाटे 5 वाजता त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या पार्थिवावर दुपारी 4 वाजता स्वर्गधाम येथे अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. भारतीय हॉकी संघाची 1964 मध्ये धुरा सांभाळत उना येथील मैडी येथील चरणजीत सिंग यांनी देशाला ऑलिम्पिकमध्ये सुवर्णपदक मिळवून दिले होते.
सात वर्षांपासून होते बिमार -
चरणजीत सिंह यांचे पुत्र वीपी सिंह आणि त्यांचे भाऊ माजी भारतीय हॉकी संघाचे खेळाडू भूपिंदर सिंह यांनी भारतीय हॉकी संघाचे माजी कर्णधार आणि पद्मश्री चरणजीत सिंह यांच्या निधनाची माहिती दिली. त्यांनी सांगितले की, मागील सात वर्षापासून त्यांची तब्येत खराब होती. चरणजीत हे खेळाला नेहमीच प्राधान्य देत होते. त्याच्या निधनाची माहिती मिळताच डीसी राघव शर्मा, एसपी अर्जित सेन ठाकुर यांच्यासह विविध प्रशासकीय अधिकाऱ्यांनी त्यांचे अंत्यदर्शन केले आहे.