पणजी -राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आमदार रवी नाईक (Ravi Naik) यांनी आज आपल्या आमदारकीचा राजीनामा (Ravi Naik resigns as Congress MLA) दिला आहे. काँग्रेसचे फोंडा विधानसभेचे आमदार असलेले रवी नाईक यांनी आज आपल्या आमदारकीचा राजीनामा विधानसभा सभापती राजेश पाटनेकर यांच्याकडे सुपूर्द केला. दरम्यान, रवी नाईक (Ravi Naik Join BJP) आज संध्याकाळी देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत भाजपात प्रवेश करणार आहेत.
Goa Cong MLA Ravi Naik resigns : रवी नाईक यांचा आमदारकीचा राजीनामा, भाजपमध्ये करणार प्रवेश - रवी नाईक भाजपमध्ये करणार प्रवेश
गोव्याचे माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आमदार रवी नाईक (Ravi Naik) यांनी आज आपल्या आमदारकीचा राजीनामा (Ravi Naik resigns as Congress MLA) दिला आहे. रवी नाईक (Ravi Naik join BJP) आज भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत.
वैयक्तिक कारणामुळे आमदारकीचा राजीनामा दिल्याचे नाईक यांनी सांगितले. रवी नाईक मागच्या काही दिवसांपासून भाजपच्या वाटेवर होते. आज अखेर त्यांनी आपल्या आमदारकीचा राजीनामा देऊन या सर्व चर्चांना पूर्णविराम दिला.
- रवी नाईक यांची राजकीय वाटचाल -
रवी नाईक हे राज्याचे माजी मुख्यमंत्री व फोंडा मतदारसंघाचे आमदार आहेत, फोंडा हा रवी नाईक यांचा पारंपरिक मतदारसंघ आहे. 1980 साली त्यांनी पहिल्यांदा महाराष्ट्र गोमंतक पक्षाकडून निवडणूक लढवली होती. 1991 साली त्यांनी काँग्रेस पक्षात प्रवेश केला. 1994 साली ते राज्याचे मुख्यमंत्री झाले. रवी नाईक यांनी आपल्या काँग्रेस सरकारच्या कारकिर्दीत सार्वजनिक बांधकाम खाते, पशुपालन व संवर्धन, महिला व बालविकास, विज्ञान व तंत्रज्ञान आदी खात्यांचे मंत्री म्हणून काम केले.