गोवा -एकीकडे राज्यात शिवसेनेच्या बंडखोर आमदारांमुळे घमासान चालू असताना तिकडे गोव्यातही राजकारण चांगलेच तापले आहे. मात्र, हे वातावरण राजकीय कारणावरून तापले नसून सावंतवाडीचे माजी उपनगराध्यक्ष संतोष बिद्रे यांच्या मुलाच्या एकतर्फी प्रेमामुळे ( One-sided love of the son of former deputy mayor of Sawantwadi ) तापले आहे. संतोष बिद्रे यांच्या मुलाने एकतर्फी प्रेमातून प्राध्यापिकेच्या खून ( Murder of a professor out of one sided love ) केलाय. त्यामुळे गोव्यात एकच खळबळ माजली ( sensation in Goa ) आहे.
डॉक्टर गौरी आचारीचा असं हत्या झालेल्या प्राध्यापिकेचे नाव आहे. शासकीय महाविद्यालयात प्राध्यापिका असणाऱ्या डॉक्टर गौरी आचारीचा गौरव बिद्रे जिम ट्रेनर होता. त्याने गुरुवारी खून करून तिचा मृतदेह ओल्ड गोवा येथील झाडीत फेकून दिला. प्राध्यापिका गौरी आचारी ही गुरुवारपासून बेपत्ता होती ( Professor has been missing since Thursday ) . संध्याकाळी तिचा मृतदेह ओल्ड गोवा परिसरात आढळून आला. त्यानुसार पोलिसांनी तपास करत आरोपी गौरव बिद्रेला ताब्यात घेतले ( Police arrested Gaurav Bidre ) आहे.
मृत डॉ. गौरी आचारी हीखांडोळा शासकीय महाविद्यालयात प्राध्यापिका होती. तर गौरव बिद्रे हा जिम ट्रेनर म्हणून काम करत होता. दरम्यानच्या काळात गौरी आणि गौरव या दोघांमध्ये ओळख वाढत गेली. गौरव हा प्राध्यापिकेवर एकतर्फी प्रेम करत होता. गौरीने दिलेल्या नकारामुळे आरोपी गौरव बिद्रेने तिला मानसिक त्रास देण्यात सुरुवात केली होती. अखेर गुरुवारी डॉक्टर गौरी तिचा खून करून तिचा मृतदेह गोवा येथील झाडी फेकून दिला . दरम्यान ही घटना एकतर्फी प्रेमातून घडली असून याप्रकरणी केलेल्या तपासातून आरोपीला ताब्यात घेतले असल्याचा नॉर्थ गोवा पोलीस अधीक्षक शोभित सक्सेना यांनी सांगितले आहे.
गौरव बिद्रे सावंतवाडीचे माजी उपनगराध्यक्षांचा मुलगा -व्यवसायाने जिम ट्रेनर असल्याने त्याने मुंबईत एटीएस, मुंबई पोलीस तसेच बीसीसीआय अधिकाऱ्यांना प्रशिक्षण दिले होते. मुंबईतील हाय प्रोफाईल सिनेस्टार ना देखील गौरव बिद्रे याने जिम ट्रेनर म्हणून प्रशिक्षण दिले होते. दरम्यान दोन वर्षांपूर्वी एका महिलेचा विनयभंग केल्याप्रकरणी त्याला जामीन मिळाला होता.
हेही वाचा -Shivsena National Executive Meeting : शिवसेना राष्ट्रीय कार्यकारिणीच्या बैठकीत उद्धव ठाकरे यांना पक्षप्रमुख म्हणून मान्यता