नवी दिल्ली/जर्मनी- तालिबानींनी अफगाणिस्तानची सत्ता ताब्यात घेतल्यानंतर अनेक नागरिकांना देश सोडून पळवावे लागले. दुसरीकडे अफगाणिस्तानमध्ये सत्तेत राहिलेल्या मंत्र्याला जर्मनीमध्ये पिझ्झा डिलिव्हरी बॉयचे काम करावे लागत आहे. सैय्यद अहमद शाह सआदत असे या अफगाणिस्तानच्या माजी दूरसंचार मंत्र्यांचे नाव आहे.
अफगाणिस्तानचे माजी दूरसंचार मंत्री सैय्यद अहमद शाह सआदत हे जर्मनीमधील लिपजिग शहरात डिलिव्हरी बॉयचे काम करत आहेत. याबाबतचे वृत्त जर्मनीच्या माध्यमात प्रसिद्धही झाले आहे.
घरोघरी जाऊन पिझ्झा डिलिव्हरीचे करतात काम-
माजी मंत्र्यांचा फोटो पाहून त्यांना ओळखणे कठीण जात आहे. कधीकाळी सुरक्षा कर्मचाऱ्यांच्या गराड्यात असलेल्या सैय्यद अहमद शाह सआदत हे शहरात पिझ्झा डिलिव्हरी बॉयचे काम करत आहेत. ते 2018 मध्ये अफगाणिस्तानचे मंत्री होते. गेल्या वर्षी ते निवृत्त झाल्यानंतर जर्मनीत गेले होते. काही दिवस चांगल्या परिस्थिती घालविल्यानंतर त्यांच्याजवळील पैसे संपले. पुन्हा त्यांच्यासमोरील संकटात वाढ झाली आहे. ते शहरात सायकलीने फिरतात. घरोघरी जाऊन पिझ्झा डिलिव्हरी करत आहेत.
ऑक्सफोर्ड विद्यापीठामधून घेतले शिक्षण
सआदत यांनी ऑक्सफोर्ड विद्यापीठामधून कम्युनिकेशनमध्ये एमएसस्सी केले आहे. तसेच ते इलेक्ट्रिकल इंजिनिअर आहेत. त्यांनी जगभरातील 13 मोठ्या शहरांमध्ये 23 वर्षे काम केले आहे.