पणजी:लक्ष्मीकांत यशवंत पार्सेकर हे मंद्रेम मतदारसंघातून (Mandrem constituency) अपक्ष निवडणूक लढवत आहेत. त्यांचा जन्म 4 जुलै 1956 रोजी पेरनेम तालुक्यातील हरमल गावात झाला झाला. ज्यांनी 2014 ते 2017 या काळात गोवा राज्याचे मुख्यमंत्रीपद भूषवले. ते मंद्रेम मतदारसंघातून गोवा विधानसभेचे सदस्य होते. मनोहर पर्रीकर (Manohar Parrikar) यांच्या जागी 8 नोव्हेंबर 2014 रोजी त्यांची गोव्याचे मुख्यमंत्री म्हणून त्यांची नियुक्ती करण्यात आली. 2017 मधे गोवा विधानसभा निवडणुकीदरम्यान, त्यांनी मंद्रेममधील जागा गमावली. 11 मार्च 2017 रोजी त्यांनी राजीनामा दिला.
लक्ष्मीकांत पार्सेकर यांनी 1980 मधे एमएससी आणि 1981 मधे बीएड केलेले आहे. त्यांचे शिक्षण पोस्ट ग्रॅज्युएट इंस्ट्रक्शन अँड रिसर्च, पणजी, तत्कालीन बॉम्बे विद्यापीठ केंद्रातून झालेले आहे. हरमल पंचक्रोशी माध्यमिक विद्यालयाचे ते मुख्याध्यापक होते. मुख्यमंत्री होण्यापूर्वी त्यांनी गोव्याचे आरोग्य मंत्री म्हणून काम केले होते तसेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी त्यांचा चांगला संबंध आहे.
1988 मध्ये, त्यांनी मांद्रेम मतदारसंघातील विद्यमान आमदार आणि महाराष्ट्रवादी गोमंतक पक्षाचे उमेदवार रमाकांत खलप यांच्या विरुद्ध भाजपचे उमेदवार म्हणून निवडणूक लढवली आणि त्यांचा पराभव झाला. मनोहर पर्रीकर, राजेंद्र आर्लेकर आणि केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री श्रीपाद नाईक यांसारख्या राजकीय दिग्गजांसह भाजपचा पाठिंबा वाढवण्यात त्यांचा मोलाचा वाटा होता. 1994 ते 1999 पर्यंत त्यांनी गोवा भाजपचे सरचिटणीस म्हणून काम केले.