महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

छत्तीसगडमधील भाजप नेते आणि माजी मंत्री राजिंदरपाल सिंह भाटियांची आत्महत्या - Rajinderpal Singh Bhatia

छत्तीसगडमधील भाजपचे ज्येष्ठ नेते आणि माजी मंत्री राजिंदरपाल सिंह भाटिया यांनी आत्महत्या केली आहे. रविवारी संध्याकाळी 7 वाजता राहत्या घरात गळफास घेऊन त्यांनी जीवन संपवले. ते त्यांच्या लहान भावासोबत येथे राहत होते.

छत्तीसगडमधील भाजप नेते आणि माजी मंत्री राजिंदरपाल सिंह भाटियांची आत्महत्या
छत्तीसगडमधील भाजप नेते आणि माजी मंत्री राजिंदरपाल सिंह भाटियांची आत्महत्या

By

Published : Sep 19, 2021, 9:39 PM IST

राजनांदगाव : छत्तीसगडमधील भाजपचे ज्येष्ठ नेते आणि माजी मंत्री राजिंदरपाल सिंह भाटिया यांनी आत्महत्या केली आहे. पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, राजिंदरपाल सिंह यांनी राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. आत्महत्येमागील कारण अद्याप समोर आलेले नाही.

रविवारी संध्याकाळी 7 वाजता राहत्या घरात गळफास घेऊन त्यांनी जीवन संपवले. ते त्यांच्या लहान भावासोबत येथे राहत होते. संध्याकाळी ते घरी एकटेच होते. त्यांचे भाऊ घरी पोहचल्यावर त्यांचा मृतदेह गळफास घेतलेल्या अवस्थेत त्यांना दिसून आला.

भाटिया यांच्या आत्महत्येच्या बातमीनंतर एकच खळबळ उडाली आहे. आतापर्यंत पोलिसांना खोलीतून काहीही सापडलेले नाही. सुसाईड नोटही सापडलेली नाही. पोलिस कुटुंबीयांची चौकशी करून या प्रकरणाचे गूढ उकलण्याचा प्रयत्न करत आहेत.

राजिंदरपाल सिंह भाटिया यांचा राजकीय प्रवास

राजिंदरपाल सिंह भाटिया हे भाजपचे एक मजबूत नेते म्हणून ओळखले जात होते. त्यांनी परिवहन मंत्री आणि CSIDC चे अध्यक्षपद भूषविले आहे. 2014 च्या विधानसभा निवडणुकीत, त्यांना भाजपने तिकीट दिले नव्हते. यानंतर त्यांनी अपक्ष म्हणून निवडणूक लढविली. त्या निवडणुकीत ते दुसऱ्या क्रमांकावर होते. 2003 मध्ये राजिंदरपाल सिंह भाटिया यांना भाजपने तिकीट दिले आणि ते आमदार झाले होते. त्यानंतरच त्यांना मंत्रीपदही मिळाले होते.

ABOUT THE AUTHOR

...view details