महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

IND vs AUS: ऑस्ट्रेलियन खेळाडूंचा रडका डाव! जडेजावर बॉल टॅम्परिंगचा केला आरोप - ball tampering

भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील चार सामन्यांच्या कसोटी मालिकेतील पहिला सामना आज गुरुवार (9 फेब्रुवारी) नागपुरात खेळवला जात आहे. (Ravindra Jadeja accused of ball tampering) या सामन्यात जडेजाने ऑस्ट्रेलियाच्या पहिल्या डावात पाच विकेट घेतल्या. त्याच्या कसोटी कारकिर्दीतील हे पाचवे पाच बळी (एका डावात पाच विकेट) होते. मात्र, ऑस्ट्रेलियन मीडियाने जडेजाचा व्हिडिओ शेअर करत नवाच वाद सुरू केला आहे.

IND vs AUS
भारत आणि ऑस्ट्रेलिया

By

Published : Feb 9, 2023, 11:03 PM IST

नागपुर :भारत-ऑस्ट्रेलिया या कसोटी मालिकेच्या पहिल्याच दिवशी मोठा वाद समोर आला आहे. रवींद्र जडेजाच्या गोलंदाजीला घाबरून ऑस्ट्रेलियन मीडियाने त्याच्या विरोधात मोठे षडयंत्र रचले आहे. ऑस्ट्रेलियन मीडियाने जडेजावर बॉल टॅम्परिंगचा आरोप केला आहे. तसेच, एक व्हिडिओ व्हायरल करत त्यामध्ये बॉ टॅम्परिंग केल्याचा दावा केला आहे. मात्र, त्या व्हिडिओत तसे काहीच झाले नाही असे स्पष्ट दिसत असल्याने ऑस्ट्रेलियाचा हा रडका डाव खेळला जात आहे असेच स्पष्ट झाले आहे.

रवींद्र जडेजाच्या गोलंदाजीवर प्रश्न : भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील पहिला कसोटी सामना हा क्रिकेट वर्तुळात चर्चेचा विषय ठरला आहे. सामन्यातील पहिल्या डावात भारतीय गोलंदाजांनी अप्रतिम गोलंदाजी करत ऑस्ट्रेलियाचा डाव 177 धावांत गुंडाळला. रवींद्र जडेजाने शानदार गोलंदाजी करताना 5, तर अश्विनने 3 बळी घेतले. मोहम्मद सिराज आणि मोहम्मद शमीला प्रत्येकी एक विकेट मिळाली. मात्र, सामान्यादरम्यानच्या या एका घटनेमुळे क्रिकेटप्रेमींमध्ये संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे. रवींद्र जडेजाच्या गोलंदाजीवर ऑस्ट्रेलियन मीडिया, माजी कर्णधार टीम पेन आणि मायकेल वॉन यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहेत.

व्हिडिओमध्ये काय : फॉक्स क्रिकेटने जडेजाचा एक व्हिडिओ शेअर केला आहे, ज्यामध्ये तो मोहम्मद सिराजशी बोलतो व त्याच्या हातावरून काहीतरी मलम किंवा क्रीम घेताना दिसत आहे. त्यानंतर तो ती क्रीम बॉलवर न लावता आपल्या बोटाला लावत आहे हे व्हिडिओमध्ये स्पष्ट दिस आहे. मात्र, तो ती क्रीम बॉलला लावत आहे असे दाखवण्याचा प्रयत्न केला आहे. मात्र, यामुळे जडेजावर बॉलशी छेडछाड केल्याचा आरोप होत सोशल मिडियावर नव्या वादाला तोंड फुटले आहे.

वॉन आणि टीम पेन यांनी प्रश्न उपस्थित केला : या व्हिडिओला इंग्लंडचा माजी कर्णधार मायकेल वॉन आणि ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार टीम पेन यांनीही पाठिंबा दिला आहे. फॉक्स क्रिकेटचे ट्विट पुन्हा शेअर करत वॉनने लिहिले – जडेजा त्याच्या फिरत्या बोटावर काय ठेवत आहे? मी हे आधी कधीच पाहिले नव्हते. भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया. त्याचवेळी टिम पेनने लिहिले आहे अस तो म्हणाला आहे.

पहिल्या दिवशी नऊ विकेट्स : जेव्हा एखादा फिंगर स्पिनर गोलंदाजी करतो तेव्हा त्याच्या बोटाला दुखणे किंवा त्वचेला त्रास होणे असे घडते. अशा परिस्थितीत जडेजाही याच परिस्थितीतून जात असण्याची शक्यता आहे. असे मत व्यक्त केले जात आहे. अशा परिस्थितीत सिराज त्यांच्यासाठी क्रीम किंवा बाम घेऊन येतो. यावरही ऑस्ट्रेलियन मीडियाने वाद सुरू केला आहे. सामन्यावर फिरकीपटूंचे वर्चस्व दिसून येत आहे. दोन्ही संघांसह फिरकीपटूंनी पहिल्या दिवशी नऊ विकेट्स घेतल्या. मात्र, हा नवाच वाद ऑस्ट्रोलियाने उकरून काढला आहे. त्यावरून ते रडका डाव खेळत आहेत हे दिसून येते

हेही वाचा :रवींद्र जडेजाचे जोरदार पुनरागमन; ऑस्ट्रेलिया विरुद्ध सामन्यात शानदार 5 विकेट

ABOUT THE AUTHOR

...view details