नवी दिल्ली -परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर हे २७ आणि २८ डिसेंबरदरम्यान कतार देशाच्या दौऱ्यावर असणार आहे. या दौऱ्यात जयशंकर यांची कतारचे उपपंतप्रधान शेख मोहम्मद बीन अब्दुल रहमान बीन जासीम अल-ठाणी आणि कतारचे विदेशमंत्री यांच्याशी बैठक होणार आहे.
हेही वाचा -झारखंडमध्ये सीआरपीएफ जवानाची स्वत:वर गोळी झाडून आत्महत्या
परराष्ट्रमंत्री झाल्यानंतर जयशंकर हे पहिल्यांदाच कतारला भेट देणार आहेत. या भेटीदरम्यान जयशंकर हे कतारच्या मंत्र्यांशी द्विपक्षीय विषयांवर चर्चा करतील. चर्चेचे मुद्दे हे दोन्ही देशांच्या परस्पर हिताचे असतील. त्याचबरोबर, कोविड संकटकाळी कतारमधील भारतीयांना केलेल्या मदतीबद्दल जयशंकर कतार देशाचे आभार मानतील, अशी माहिती परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाने दिली.