श्रीनगर - जम्मू काश्मीरमधील परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी युरोपीय संघाचे प्रतिनिधीमंडळ दोन दिवसीय दौऱ्यावर आहे. जवळपास 24 देशांच्या प्रतिनिधींचा या मंडळामध्ये समावेश असून ते बुधवारी काश्मीरमध्ये पोहचले. जम्मू काश्मीरला विशेष दर्जा देणारे कलम 370 रद्द केल्यानंतर राज्यातील परिस्थितीचा आढावा हे मंडळ घेईल. राज्यातील परिस्थिती पूर्वपदावर येत आहे. जम्मू-काश्मीरमध्ये जिल्हा विकास परिषदेच्या निवडणुका पार पडल्या आहेत. तसेच केंद्राने 4-जी सेवा पूर्ववत केली आहे.
चिली, ब्राझिल, क्यूबा, बोलीविया, एस्टोनिया, फिनलँड, फ्रान्स, आयरलँड, नीदरलँड, पुर्तगाल, यूरोपीय संघ, बेल्जियम, स्पेन, स्वीडन, इटली, बांगलादेश, मलावी, इरिट्रिया, कोट डिवार, घाना, सेनेगल, मलेशिया, ताजिकिस्तान आणि किर्गिस्तानचे प्रतिनिधी जम्मू काश्मीरच्या दौऱ्यावर आहेत. कलम 370 रद्द केल्यानंतर दोनदा परराष्ट्रीय मंडळाने काश्मीरचा दौरा केला आहे. ही त्यांची तीसरी वेळ आहे.