महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

Forbes Women Entrepreneurs: फोर्ब्सच्या २० आशियाई महिला उद्योजकांच्या यादीत तीन भारतीय महिलांचा समावेश - भारतीय महिला उद्योजक

Forbes Women Entrepreneurs: फोर्ब्सच्या नोव्हेंबरच्या अंकात FORBES NOVEMBER ISSUE प्रसिद्ध झालेल्या 20 आशियाई महिला उद्योजकांच्या यादीत तीन भारतीय महिलांचा समावेश करण्यात आला LIST OF 20 ASIAN WOMEN ENTREPRENEURS आहे.

FORBES NOVEMBER ISSUE LIST OF 20 ASIAN WOMEN ENTREPRENEURS THREE INDIANS INCLUDED
फोर्ब्सच्या २० आशियाई महिला उद्योजकांच्या यादीत तीन भारतीय महिलांचा समावेश

By

Published : Nov 8, 2022, 1:03 PM IST

सिंगापूर : Forbes Women Entrepreneurs: फोर्ब्सच्या नोव्हेंबरच्या अंकात FORBES NOVEMBER ISSUE प्रसिद्ध झालेल्या 20 आशियाई महिला उद्योजकांच्या यादीत तीन भारतीयांचा समावेश करण्यात आला LIST OF 20 ASIAN WOMEN ENTREPRENEURS आहे. या यादीत अशा महिलांचा समावेश आहे ज्यांनी कोविड-19 साथीच्या आजारामुळे निर्माण झालेल्या अनिश्चिततेमध्ये आपला व्यवसाय वाढवण्यात उल्लेखनीय यश मिळवले.

या यादीमध्ये स्टील अथॉरिटी ऑफ इंडिया लिमिटेडच्या अध्यक्षा सोमा मंडल, एमक्योर फार्माच्या कार्यकारी संचालक नमिता थापर आणि होन्सा कंझ्युमरच्या सह-संस्थापक आणि मुख्य नवोपक्रम अधिकारी गजल अलघ यांचा समावेश आहे.

फोर्ब्सने मंगळवारी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, या यादीतील काही महिला शिपिंग, रिअल इस्टेट आणि बांधकाम यासारख्या क्षेत्रात काम करत आहेत, तर काही तंत्रज्ञान, औषध आणि कमोडिटी यासारख्या क्षेत्रात नवनवीन शोध घेत आहेत. यादीतील इतर महिला ऑस्ट्रेलिया, चीन, दक्षिण कोरिया, इंडोनेशिया, जपान, सिंगापूर, दक्षिण कोरिया, तैवान आणि थायलंडमधील आहेत.

ABOUT THE AUTHOR

...view details