त्रिशूर (केरळ ) : इरिंजडप्पिल्ली श्री. कृष्ण मंदिराने धार्मिक विधी करण्यासाठी 800 किलो वजनाचा 11 फूट रोबोटिक हत्ती सादर केला आहे. ते पेटा (पीपल फॉर एथिकल ट्रीटमेंट ऑफ अॅनिमल्स इंडिया) ने रोबोटिक हत्ती मंदिराला दान केला आहेत. या रोबोटिक हत्तीचे नाव ‘इरिंजदप्पिल्ली रामन’ असे ठेवण्यात आले आहे. हा रोबोटिक हत्ती मजबूत असून मिरवणुकीत वापरता येणार आहे. हा हत्ती लोखंडी फ्रेमसह रबर कोटिंगने बनलेले आहे. या हत्तीची किंमत 5 लाख रुपये आहे. सिने कलाकार पार्वती थिरुवोथू यांच्या सहकार्याने रोबोटिक हत्ती दान करण्यात आला आहे.
रोबोटिक' हत्ती भाविकांच्या सेवेत सामील :केरळमधील त्रिशूर जिल्ह्यातील इरिन्जादापिल्ली श्री कृष्ण मंदिरात प्रथमच 'रोबोटिक' हत्ती भाविकांच्या सेवेत सामील झाला आहे. मंदिरात विविध धार्मिक विधी, उत्सव आणि इतर कोणत्याही कारणासाठी जिवंत हत्ती किंवा इतर प्राणी ठेवू नका किंवा भाड्याने घेऊ नका, असे आवाहन करण्यात आले होते. यानंतर, पेटा इंडियाने अभिनेता पार्वती थिरुवोथू यांच्या सहकार्याने मंदिराला 'रोबोटिक' हत्ती भेट दिला.
रोबोटिक हत्तीचे वैशिष्ट्ये :या हत्तीचे नाव इरिन्जादापिल्ली रामन ठेवण्यात आले आहे. त्याची उंची साडे 11 फूट आहे असून वजन 800 किलो आहे. या हत्तीचे डोके, डोळे, तोंड, कान, शेपूट विजेवर चालनारे आहेत. २६ फेब्रुवारीला इरिन्जादप्पिल्ली रामन यांचा 'नादायरुथल' म्हणजे देवांना हत्ती अर्पण करण्याचा कार्यक्रम आयोजीत करण्यात आला होता.
जीवीतहानी टाळण्यासाठी रोबोटिक हत्ती :या संदर्भात, पेटा ने आपल्या निवेदनात म्हटले आहे की, केरळमधील मंदिरांमध्ये विविध उत्सवांसाठी हत्तींची उपस्थिती अनिवार्य असते. परंतु मानवी बंदिवासात असलेले हत्ती अनेकदा हिंसक बनलेले पहायला मिळतात. बंदिवासातून सुटण्यासाठी हत्ती हिंसक बनतात असे निवेदनात म्हटले आहे. त्यामुळे मोठ्या प्रमाणात जीवित, वित्तहानी होण्याची शक्याता असतचे. हेरिटेज अॅनिमल टास्क फोर्सने केलेल्या सर्वेक्षणानुसार केरळमध्ये गेल्या 15 वर्षात एकूण 526 लोकांचा बंदिस्त हत्तींनी बळी घेतला आहे. त्यामुळे जीवीतहानी टाळण्यासाठी हत्तींऐवजी रोबोटिक हत्ती वापरण्याची मागणी करण्यात आली होती. ती मागणी पूर्ण झाली असून रोबोटीक हत्ती भाविकांच्या सेवते दाखल झाल्याचे निवेदनात म्हटले आहे.
हेही वाचा -MLC Chief Whip Row : विधानपरिषदेत आवाज ठाकरेंचाच! 'दोन तृतीयांश सदस्य फोडणे शिंदेंना कठीण'