महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

The Child's Life : कापडासाठी आईने पोटच्या मुलालाच साडीने बांधून दहाव्या मजल्यावर लटकवले - The video went viral

एका कापडा साठी आईने आपल्या मुलाचा जीव पणाला लावत (A mother risks her child's life) त्याला साडीने बांधून दहाव्या मजल्यावरून लटकावल्याचा धक्कादायक प्रकार फरीदाबाद मधे उघडकीस आला आहे. या प्रकाराचा व्हिडिओ सध्या मोठ्या प्रमाणावर व्हायरल (The video went viral) होत आहे.

The Child's Life
मुलाचा साडीने बांधून लटकवले

By

Published : Feb 12, 2022, 10:44 AM IST

Updated : Feb 12, 2022, 11:00 AM IST

फरीदाबाद: एका कापडासाठी आईने मुलाचा जीव लावला पणाला लावत ((A mother risks her child's life)) त्याला साडीने बांधून दहाव्या मजल्यावर लटकवल्याचा व्हिडिओ सध्या जोरदार व्हायरल (The video went viral) होत आहे. या प्रकाराची चर्चा झाल्या नंतर त्या महिलेने मला माझ्या चुकीचा पश्चाताप होतो आहे असे म्हणले आहे.

हरियाणातील फरिदाबादमध्ये एका महिलेने आपल्या लहान मुलाला साडीने बांधून १०व्या मजल्यावर लटकवल्याचा धक्कादायक व्हिडिओ समोर आला आहे. तीने त्याला साडीला बांधुन 10 व्या मजल्यावरून नवव्या मजल्यावरच्या बाल्कनीत पडलेले कपडे काढण्यासाठी खाली लटकवले.

शेजाऱ्यांनीही संपूर्ण घटनेचे चित्रीकरण केले. या महिलेच्या कृत्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. व्हिडीओमध्ये ही महिला आपल्या कुटुंबासोबत सोसायटीच्या 10व्या मजल्यावर राहत असल्याचे दिसते. तिचे कपडे नवव्या मजल्याच्या बाल्कनीत पडले आणि फ्लॅट बंद होता. यात महिलेने कपडे आणण्यासाठी मुलाला साडी ला बांधून नवव्या मजल्यावर खाली पाठवले. कपडे आणि साडी घेऊन मुलगा पुन्हा दहाव्या मजल्यावर परतला. पण हा प्रकार पाहुन सगळेच आचंबीत झाले. साध्या कपड्यासाठी तीने चिमुकल्या मुलाचा जीव धोक्यात टाकल्याचा प्रकार या निमीत्ताने समोर आला. व्हिडिओ व्हायरल झाल्यावर मात्र त्या महिलेने आपल्या कृत्या बद्दल पश्चाताप होत आहे असे म्हणले आहे.

Last Updated : Feb 12, 2022, 11:00 AM IST

ABOUT THE AUTHOR

...view details