मंगळूर (कर्नाटक) : वसतिगृहात दिले जाणारे तूप भात आणि चिकन कबाब खाल्ल्यानंतर विषबाधा झाल्यामुळे मंगळुरूमधील 137 विद्यार्थिनींना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. शहरातील सिटी हॉस्पिटलशी संलग्न असलेल्या सिटी नर्सिंग कॉलेजची विद्यार्थिनी रविवारी रात्री तूप भात आणि चिकन कबाब खाल्ल्याने आजारी पडली. त्यानंतर सोमवारी सकाळी 2 वाजण्याच्या सुमारास अनेक विद्यार्थिनींना अस्वस्थ वाटू लागल्याने त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. सोमवारी सकाळपासून रात्रीपर्यंत 137 विद्यार्थिनींना रुग्णालयात दाखल करण्यात आले.
100 हून अधिक विद्यार्थिनी गैरहजर : सिटी नर्सिंग कॉलेजच्या वर्गात काल 100 हून अधिक विद्यार्थिनी गैरहजर होत्या. त्या का आल्या नाही याची चौकशी केली असता त्यांना अन्नातून विषबाधा झाल्याचा प्रकार समोर आला. रात्री आठ वाजण्याच्या सुमारास शहरातील रुग्णालयासमोर सुमारे 400 विद्यार्थी व पालक जमा झाले. पोलिस विभागाने जमलेल्या लोकांची तपासणी केली असता पुड पॉयझनचा मुद्दा समोर आला. त्यानंतर पोलिस वसतिगृहाला भेट देऊन तपासणी करत आहेत.
विद्यार्थिनींना उलट्या आणि पोटदुखीचा त्रास : वसतिगृहातील तूप भात आणि चिकन कबाब खाल्ल्यानंतर विद्यार्थिनींना उलट्या आणि पोटदुखीचा त्रास सुरु झाला. त्यामुळे आजारी पडलेल्या १३७ विद्यार्थिनी विविध रुग्णालयात उपचार घेत आहेत. शहरातील एजे हॉस्पिटलमध्ये 52, केएमसी ज्योती येथे 18, युनिटी हॉस्पिटलमध्ये 14, सिटी हॉस्पिटलमध्ये 8, मंगला हॉस्पिटलमध्ये 3 आणि कंकनदी फादर मुलर हॉस्पिटलमध्ये 42 जणींवर उपचार सुरू आहेत.
पहाटे 2 वाजता पडल्या आजारी : अन्नातून विषबाधा झालेल्या एका विद्यार्थ्यीनीने सांगितले की, 'आमच्यापैकी बऱ्याच जणी रविवारी रात्री जेवल्यानंतर पहाटे 2 वाजता आजारी पडल्या. वसतिगृहातील मेसमध्ये भात आणि चिकन देण्यात आले'. सर्व विद्यार्थीनी आजारी असल्याची माहिती मिळताच पोलिसांनी वेगवेगळ्या रुग्णालयात जाऊन माहिती घेतली. मंगळुरू शहराचे पोलिस आयुक्त शशीकुमार यांनी विविध रुग्णालयांना भेटी दिल्या आहेत.
विद्यार्थिनींचे पालक रुग्णालयाबाहेर जमले : यावेळी बोलताना शहर पोलिस आयुक्त शशीकुमार म्हणाले की, 'सिटी नर्सिंग कॉलेजच्या पॅरा-मेडिकलच्या विद्यार्थिनी अन्नातून विषबाधा झाल्यामुळे आजारी आहेत. काल अनेक विद्यार्थिनी महाविद्यालयात गैरहजर राहिल्यानंतर त्यांनी चौकशी केली असता ही बाब निदर्शनास आली. सुमारे 400 विद्यार्थिनींचे पालक रुग्णालयासमोर जमा झाले होते. 137 विद्यार्थिनी 6 रुग्णालयात उपचार घेत आहेत'. कोणाच्याही जीवाला धोका नसल्याची माहिती त्यांनी दिली.
विद्यार्थिनींना लवकरच डिस्चार्ज : या घटनेनंतर जिल्हा सर्वेक्षकांच्या पथकाने पाहणी केली आहे. त्यांनी आजारी विद्यार्थी आणि डॉक्टरांशी सल्लामसलत केली. वसतिगृहात जाऊन विद्यार्थिनींनी खाल्लेल्या अन्नाचे नमुने घेतले. यावेळी बोलताना आरोग्य अधिकारी डॉ. अशोक म्हणाले, भीतीमुळे अनेक विद्यार्थ्यीनींना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्यांचे प्रकृती स्थिर आहे. अनेक विद्यार्थिनींना लवकरच रुग्णालयातून डिस्चार्ज मिळणार आहे. सर्वांवर उपचार सुरू असून, घाबरण्याचे कोणतेही कारण नसल्याचे त्यांनी सांगितले.
हेही वाचा :JEE Main Topper Interview : जेईई टॉपर ज्ञानेश इंटरनेट आणि सोशल मीडियापासून चार हाथ लांबच, मोटिव्हेशनसाठी वाजवत असे गिटार!