गुवाहाटी: तृणमूल काँग्रेसने गुवाहाटीतील रॅडिसन ब्लूसमोर गुरुवारी निदर्शने केल्यानंतर गुवाहाटीतील रॅडिसन ब्लूसमोर एनएसयूआयने पण निदर्शने केले. एनएसयूआयचे राज्य उपाध्यक्ष रक्तीम दत्ता यांच्या नेतृत्वाखाली आंदोलकांनी सरकारच्या विरोधात आणि विविध सरकारविरोधी घोषणाबाजी केली. एनएसयूआयच्या आंदोलकांनी हातात बॅनर घेऊन हाॅटेलवर मोर्चा काढला. परंतु पोलिसांनी त्यांना बॅरिकेट लावुन रोखले. आंदोलकांना पोलिसांनी अटक करून बसमधून नेले. दत्ता यांनी भाजप सरकारवर जोरदार टीका केली. भाजप आमदारांची खरेदी-विक्री करत असल्याची टीका त्यांनी केली.
आसाममधे आसाममध्ये पूरस्थिती बिकट बनली आहे. शेकडो हेक्टर शेतजमीन आणि घरे नदीत वाहून गेली आहेत.मात्र मुख्यमंत्री हिमंता बिस्वा शर्मा हे महाराष्ट्रातील सरकार पाडण्याच्या कामात गुंतले आहेत अशी टीएमसी आणि एनएसयुआय ने टीका केली आहे. बंडखोर नेते एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेना ४५ शिवसेना आणि आठ अपक्ष आमदारांसह गुवाहाटी येथील रॅडिसन ब्लू येथे तळ ठोकून आहे. तृणमूल काँग्रेस आणि एनएसयूआयच्या निषेधानंतर सीआरपीएफ आणि पोलिसांनी रेडिसन ब्लूच्या आसपास कडक सुरक्षा तैनात केली आहे.