महाराष्ट्र

maharashtra

By

Published : Mar 28, 2021, 12:39 PM IST

ETV Bharat / bharat

गुरुग्राममध्ये निर्माणाधीन उड्डाणपुलाचा काही भाग कोसळला

गुरुग्रामच्या दौलताबाद येथील द्वारका एक्स्प्रेस महामार्गावरील निर्माणाधीन उड्डाणपूलाचा काही भाग कोसळला. या अपघातात तीन मजूर जखमी झाले आहेत. संबंधित उड्डाणपूल गुरुग्राम ते दिल्ली द्वारकापर्यंत तयार करण्यात येत आहे.

गुरुग्राम
गुरुग्राम

गुरुग्राम - गुरुग्रामच्या दौलताबाद येथील द्वारका एक्स्प्रेस महामार्गावर सुरू असलेल्या उड्डाणपूलाचा काही भाग कोसळला. या अपघातात तीन मजूर जखमी झाले आहेत. सिव्हिल डिफेन्स आणि एसडीआरएफ हरियाणाची टीम घटनास्थळी पोहोचली आहे. सकाळी साडेसातच्या सुमारास हा प्रकार घडल्याचे सांगण्यात येत आहे. यापूर्वीही सोहना रोडवर बांधण्यात येत असलेला उड्डाणपूल कोसळला होता.

द्वारका एक्स्प्रेस महामार्गावरील निर्माणाधीन उड्डाणपूलाचा काही भाग कोसळला

स्थानिक लोकांचे म्हणणे आहे, की त्यांनी जोरदार स्फोट झाल्याचा आवाज ऐकला आणि जेव्हा ते घटनास्थळी पोहोचले, तेव्हा उड्डाणपुलाचा काही भाग खाली पडलेला त्यांना दिसला. यानंतर लोकांनी या अपघाताची माहिती पोलिसांना दिली.

अपघातात तीन मजूर जखमी झाले आहेत. पण कुणाचा मृत्यू झालेला नाही. उड्डाणपुलाचा स्लॅब काढल्यावरच तळाशी आणखी काही दबलेले आहे का, हे स्पष्ट होईल. मदत आणि बचावकार्य चालू आहे, असे डीसीपी दीपक सहारन यांनी सांगितले.

फेब्रुवारी महिन्यात गुरुग्राम खासदार राव इंद्रजीत सिंह यांनी केंद्रीय परिवहन मंत्री नितीन गडकरी यांना पुलाचे काम बेजबाबदपणे होत असल्याची तक्रार केली होती. तेव्हा हे प्रकरण गांभीर्याने घेत गडकरी यांनी द्वारका एक्स्प्रेसवेची पाहणी केली होती आणि अधिकाऱ्यांना वेगवान काम करण्याचे आदेश दिले होते. संबंधित उड्डाणपूल गुरुग्राम ते दिल्ली द्वारकापर्यंत तयार करण्यात येत आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details