महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

आसाममध्ये पूरस्थिती अजूनही गंभीर : ७३ जणांचा मृत्यू - आसाममध्ये पूरस्थिती गंभीर

आसाममधील पूरस्थिती अजूनही गुंतागुंतीची आहे. राज्यातील 35 जिल्ह्यांपैकी 32 जिल्हे प्रभावित झाले आहेत. 125 महसूल मंडळांतर्गत एकूण 5424 गावे पूरग्रस्त भागात असल्याची नोंद आहे.

आसाममध्ये पूरस्थिती अजूनही गंभीर
आसाममध्ये पूरस्थिती अजूनही गंभीर

By

Published : Jun 21, 2022, 9:54 AM IST

गुवाहाटी: आसाममधील पूरस्थिती अजूनही गुंतागुंतीची आहे. राज्यातील 35 जिल्ह्यांपैकी 32 जिल्हे प्रभावित झाले आहेत. 125 महसूल मंडळांतर्गत एकूण 5424 गावे पूरग्रस्त भागात असल्याची नोंद आहे.

73 जणांचा बळी - ASDMA नुसार, 4772140 लोक विनाशकारी पुरामुळे प्रभावित झाले आहेत. दुसऱ्यांदा आलेल्या पुरात आतापर्यंत ७३ जणांना जीव गमवावा लागला आहे. सोमवारी प्राण गमावलेल्यांची संख्या ११ आहे. एकूण 3384326 जनावरांना पुराचा फटका बसला आहे. या पुरात एकूण 5232 जनावरे वाहून गेली आहेत.


बचाव पथकांचे काम सुरू - एनडीआरएफ, एसडीआरएफ, भारतीय लष्कर, अग्निशमन दल इत्यादी पूरग्रस्त भागात बचाव कार्य सुरू ठेवत आहेत एकूण 23,1819 लोकांनी राज्यभरातील छावण्यांमध्ये आश्रय घेतला आहे. पूरग्रस्त भागात एकूण 1425 छावण्या उभारण्यात आल्या आहेत. एनडीआरएफ, एसडीआरएफ, भारतीय लष्कर, अग्निशमन दल इत्यादी पूरग्रस्त भागात बचाव कार्य सुरू ठेवत आहेत एकूण 23,1819 लोकांनी राज्यभरातील छावण्यांमध्ये आश्रय घेतला आहे. पूरग्रस्त भागात एकूण 1425 छावण्या उभारण्यात आल्या आहेत.


मुख्यमंत्र्यांचीही परिस्थितीवर नजर - मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा यांनी सोमवारी पूरग्रस्त जिल्ह्यांच्या उपायुक्तांसोबत व्हिडिओ कॉन्फरन्स घेतली. पूरग्रस्तांना पुरेशी मदत करण्याचे निर्देश मुख्यमंत्र्यांनी दिले. ज्या ठिकाणी बचाव दल किंवा मदत नौका पोहोचू शकल्या नाहीत अशा ठिकाणी हेलिकॉप्टरद्वारे मदत वाटप करण्याचे आदेश मुख्यमंत्री सरमा यांनी दिले आहेत.

हेही वाचा - Guwahati Landslide : गुवाहाटी शहरात भूस्खलनात चौघांचा मृत्यू.. जोरदार पाऊस

ABOUT THE AUTHOR

...view details