महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

अफगाणिस्तानवर तालिबानचा कब्जा, 220 भारतीयांना घेऊन विमान दिल्लीत दाखल - राष्ट्रपती अशरफ गनी

तालिबानने अफगाणिस्तान ताब्यात घेतले आहे. त्यामुळे तेथील लोक देश सोडू लागले आहेत. त्यामुळे आज काबूलमधून सुमारे 220 भारतीयांना दोन विमानांनी भारतात आणण्यात आले आहे. दरम्यान, अफगाणिस्तानचे राष्ट्रपती अशरफ गनी यांनीही देश सोडून पलायन केले आहे.

afghanistan
afghanistan

By

Published : Aug 15, 2021, 11:00 PM IST

वी दिल्ली : तालिबानने अफगाणिस्तान ताब्यात घेतले आहे. त्यामुळे तेथील लोक देश सोडून पळू लागले आहे. त्यामुळे आज (15 ऑगस्ट) अफगाणिस्तानची राजधानी काबूल येथून सुमारे 220 भारतीयांना दोन वेगवेगळ्या विमानांनी भारतात आणण्यात आले आहे. मुख्यतः अफगाणिस्तानमध्ये राहणारे भारतीय हिंदू आणि शीख आहेत.

अफगाणिस्तानच्या राष्ट्रपतींनीही देश सोडला

तालिबानने अफगाणिस्तान ताब्यात घेतले आहे. सत्ता हस्तांतरणाची प्रक्रिया सुरू आहे. काबूललाही घेरले आहे. त्यामुळे अफगाणिस्तानचे राष्ट्राध्यक्ष अशरफ गनी (President of Afghanistan Ashraf Ghani) यांनी तालिबानपुढे गुडघे टेकले आहेत. त्यांनी राजीनामा देऊन देश सोडून पळ काढला आहे.

पहिल्या विमानाने 100 भारतीय दिल्लीत दाखल

मिळालेल्या माहितीनुसार, तालिबानने रविवारी अफगाणिस्तानातील जलालाबाद शहर ताब्यात घेतले आहे. यानंतर, आता फक्त काबूल हे अफगाणिस्तान सरकारच्या अधिकाराखाली एक मोठे शहर राहिले आहे. हे पाहता तेथे राहणाऱ्या भारतीयांनी स्थलांतर करण्यास सुरुवात केली आहे. रविवारी एअर इंडियाचे (Air India) RQ-915 हे पहिले विमान काबूलहून दिल्लीत दुपारी 2 वाजता 100 भारतीयांना घेऊन पोहोचले.

दुसऱ्या विमानाने 120 भारतीय दिल्लीत

तर, एअर इंडियाचे दुसरे विमान AI-244 संध्याकाळी 7 वाजता दिल्लीत पोहोचले. यातून सुमारे 120 प्रवासी दिल्लीत दाखल झाले.

आणखी विमाने भारतीयांना घेऊन येणार

विमानतळाच्या सूत्रानुसार, येत्या दोन ते तीन दिवसात आणखी विमाने भारतीय नागरिकांना घेऊन येणार आहेत.

अफगाणिस्तानातआता अली अहमद जलाली सत्तेत येण्यीची शक्यता

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, अफगाणिस्तान सरकारने इस्लामी अतिरेक्यांना शरण आल्यानंतर अली अहमद जलाली (Ali Ahmed Jalali) यांना नवीन अंतरिम सरकारचे प्रमुख म्हणून नियुक्त केले जाण्याची शक्यता आहे. वाचा, कोण आहेत अली अहमद जलाली?

हेही वाचा -...तर आपल्याला चीन पुढे झुकावे लागेल - सरसंघचालक डॉ. मोहन भागवत

ABOUT THE AUTHOR

...view details