महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

Five Year Old Donate Eyes : पाच वर्षाच्या मुलीच्या नेत्रदानाने दोघांचे जीवन उजळणार! - Five Year Old Donate Eyes

आग्रा येथील केटी वयाच्या पाचव्या वर्षी नेत्रदान करून (five year old girl donate eyes) सर्वात तरुण नेत्रदाता बनली आहे. केटीच्या नेत्रदानामुळे आग्रा एसएन मेडिकल कॉलेजला (Agra SN Medical College) दोन कॉर्निया मिळाले आहेत. (five year old girl gave sight to two peoples). आता या दोन कॉर्नियाचे प्रत्यारोपण लहान मुलांपासून ते वृद्धांपर्यंत अंधत्वाचा त्रास होत असलेल्या व्यक्तींना करण्यात येणार आहे.

Etv Bharat
Etv Bharat

By

Published : Dec 16, 2022, 6:24 PM IST

आग्रा :पाच वर्षांची मुलगी केटीच्या आकस्मिक निधनानंतर वडिलांनी तिचे नेत्रदान करण्याचा निर्णय घेतला. (five year old girl donate eyes in agra) आता केटीच्या डोळ्यांद्वारे दुसरे कोणीतरी जग पाहू शकते. कुटुंबीयांच्या इच्छेनुसार एसएन मेडिकल कॉलेजच्या नेत्रपेढीने केटीच्या दोन्ही डोळ्यांची यशस्वी चाचणी केली आहे. त्यामुळे आता बालकांपासून वृद्धांपर्यंत अंधत्वाशी झगडणाऱ्यांचे जीवन उजळून निघणार आहे. (five year old girl gave sight to two peoples).

कुटुंबीयांनी डोळे दान करण्याचा निर्णय घेतला : आग्र्यामध्ये पाच वर्षांच्या मुलीचे नेत्रदान चर्चेचा विषय बनले आहे. उत्तर विजय नगर कॉलनीत राहणारे विवेक अग्रवाल हे सीए आहेत. ते 'द इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाउंटंट्स ऑफ इंडिया'च्या आग्रा शाखेचे उपाध्यक्ष आहेत. अग्रवाल यांची पाच वर्षांची मुलगी केती अग्रवाल हिचा गुरुवारी सकाळी 8.30 वाजता अचानक मृत्यू झाला. त्यानंतर विवेक अग्रवाल आणि त्यांच्या कुटुंबीयांनी केटीचे डोळे दान करण्याचा निर्णय घेतला. त्यांनी एसएन मेडिकल कॉलेजच्या नेत्रपेढीच्या प्रभारी डॉ. शेफाली मजुमदार यांच्याशी संपर्क साधला. एसएन मेडिकल कॉलेजची टीम त्यांच्या घरी पोहोचली आणि केटीचे नेत्रदान केल्या गेले.

दोघांना मिळेल दृष्टी :नेत्रपेढीच्या प्रभारी डॉ. शेफाली मजुमदार म्हणाल्या की, आग्राच्या केटीच्या नेत्रदानामुळे आग्रा एसएन मेडिकल कॉलेजला दोन कॉर्निया मिळाले आहेत. आता या दोन कॉर्नियाचे प्रत्यारोपण लहान मुलांपासून ते वृद्धांपर्यंत अंधत्वाचा त्रास होत असलेल्या व्यक्तींना करण्यात येणार आहे. शेफाली मजुमदार यांनी सांगितले की, एखाद्याच्या मृत्यूनंतर सहा तासांत नेत्रदान करता येते. ज्या व्यक्तीचे नेत्रदान केले जात आहे त्याच्या डोळ्यांवर ओला कापूस घाला. खोलीचा पंखा बंद करा. त्यामुळे डोळ्यांच्या कॉर्नियामध्ये ओलावा राहतो. यासोबतच मृताच्या डोक्याखाली उशी ठेवावी. नेत्रदानासाठी तुम्ही एसएन मेडिकल कॉलेजच्या ९६३९५९२८९४ या हेल्पलाइन क्रमांकावर कॉल करू शकता.

ABOUT THE AUTHOR

...view details