नवी दिल्ली Exit Polls २०२३ : विधानसभा निवडणूक 2023 च्या एक्झिट पोलची आकडेवारी समोर आली आहे. तेलंगणा, मिझोराम, मध्य प्रदेश, छत्तीसगड, राजस्थान या पाचही राज्यांसाठी निकालाचे अंदाज जाहीर करण्यात आले आहेत. छत्तीसगडमध्ये काँग्रेसला सर्वाधिक जागा मिळणार असल्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. ॲक्सिस माय इंडियाच्या सर्वेक्षणानुसार, काँग्रेसला 40 ते 50 जागा मिळण्याची शक्यता आहे. तसंच भाजपाला 36 ते 46 जागा मिळू शकतात. इतरांना एक ते पाच जागा मिळू शकतात, असा अंदाज वर्तवण्यात आला आहे. छत्तीसगडमध्ये विधानसभेच्या एकूण 90 जागा आहेत.
छत्तीसगड निवडणूक :'जन की बात'च्या सर्वेक्षणात भाजपाला 34 ते 45, काँग्रेसला 42 ते 53 जागा मिळण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. 'चाणक्य'च्या सर्वेक्षणात भाजपाला 33 पेक्षा जास्त जागा मिळतील असा अंदाज वर्तवण्यात आला आहे. तसंच काँग्रेसला 57 पेक्षा जास्त जागा मिळण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. 'सी व्होटर'च्या सर्वेक्षणात काँग्रेसला 41 ते 53, भाजपाला 36 ते 48 इतरांना चार जागा मिळण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
मध्य प्रदेश विधानसभा : 230 जागा असलेल्या मध्य प्रदेश विधानसभेच्या एक्झिट पोलमध्ये भाजपा-काँग्रेस यांच्यात जोरदार लढत झाली आहे. 'जन की बात' सर्वेक्षणानुसार भाजपाला 100 ते 123 जागा मिळण्याची शक्यता आहे. काँग्रेसला 102 ते 105 जागा मिळू शकतात, तर इतरांना पाच जागा मिळू शकतात, असा अंदाज वर्तवण्यात आला आहे. 'रिपब्लिक'च्या सर्वेक्षणानुसार भाजपाला 118 ते 130, काँग्रेसला 97 ते 107 तसंच इतरांना दोन जागा मिळण्याची शक्यता आहे. 'पोलस्ट्रॉट'च्या सर्वेक्षणानुसार भाजपाला 106 ते 116 जागा मिळण्याची शक्यता आहे. काँग्रेसला 111 ते 121 जागा मिळताना दिसत आहेत. इतरांना सहा जागा मिळू शकतात, असा अंदाज वर्तवण्यात आला आहे.
मिझोरम विधानसभा :40 जागांच्या मिझोराम विधानसभेत 'जन की बात' सर्वेक्षणात 'एमएनएफ'ला 10 ते 14 जागा, 'झेडपीएम'ला 15 ते 25 जागा, काँग्रेसला पाच ते नऊ, भाजपाला दोन जागा मिळण्याची शक्यता आहे.
तेलंगाणा विधानसभा : 119 जागांच्या तेलंगाणा विधानसभेसाठी गुरुवारी निवडणूक पार पडली. 'जन की बात' सर्वेक्षणात काँग्रेसला 48 ते 64 जागा, बीआरएसला 40 ते 55 जागा, भाजपाला 7 ते 13, 'एआयएमआयएम'ला 4 ते 7 जागा मिळण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.