डेहराडून -मुलगी आणि वडिलांच्या नात्याला काळीमा फासणारी घटना उत्तराखंड राज्यात घडली आहे. नैनिताल जिल्ह्यातील एका गावातील पाच मुलींनी वडील लैंगिक अत्याचार करत असल्याचा आरोप केला आहे. घरातील त्रासाला कंटाळून मली घर सोडून निघून गेल्या होत्या. मात्र, महिला आयोगाच्या माजी उपाध्यक्ष अमिता लोहनी यांच्या मदतीने त्यांनी पोलिसांत तक्रार दाखल केली.
त्रासाला कंटाळून जंगलात लपून बसल्या -
महिला आयोगाच्या माजी उपाध्यक्ष अमिता लोहनी मागील अनेक दिवसांपासून दारू पिऊन वडील अत्याचार करत असल्याची आपबीती मुलींनी सांगितली. कालाढुंगी पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल केला असून मुलींना बाल सुरक्षा गृहात हलवले आहे. या पाचही पीडित मुली अल्पवयीन असल्याची माहिती मिळाली आहे. घरातील त्रासाला कंटाळून मुलींनी घरातून पळ काढला होता. जंगलाचा त्यांनी रात्री आसरा घेतला. मात्र, या प्रकरणाची माहिती महिला आयोगाच्या माजी उपाध्यक्षा अमिता लोहनी यांनी मिळाल्यावर त्यांनी हस्तक्षेप करत मुलींनी धीर दिला. तसेच होत असलेल्या अत्याचाराची सविस्तर माहिती घेतली.
पाचही मुली घरातून पळून जाऊन सीतावनी जंगलात रात्रभर थांबल्या. मात्र, सकाळी जवळील नागरिकांनी त्यांची चौकशी केली. तेव्हा हे प्रकरण पुढे आले. स्थानिक नागरिकांनी अमिता लोहनी यांना या प्रकरणाची माहिती दिली. त्यांनी मुलींची चौकशी केली. तसेच त्यांना पोलीस चौकीत घेवून गेल्या. तेथे मुलींनी सांगितले की, सुरूवातीला आम्ही आईकडे तक्रार केली होती. मात्र, आईनेही आम्हाला मारहाण केली, असे मुलींनी पोलिसांना सांगितले.