हरिद्वार :हरिद्वारमधील पाथरी पोलीस स्टेशन हद्दीतील फुलगढ शिवगढ गावात बनावट दारू प्यायल्याने पाच जणांचा मृत्यू ( Five people died drinking spurious liquor ) झाल्याची बातमी समोर येत आहे. मात्र प्रशासनाने आतापर्यंत केवळ चार जणांच्या मृत्यूला दुजोरा दिला आहे. या प्रकरणाची माहिती मिळताच प्रशासन आणि पोलिसांमध्ये खळबळ उडाली आहे. फुलगढ गावातील रहिवासी राजू अमरपाल आणि भोला यांचा बनावट दारू प्यायल्याने मृत्यू झाला. त्याचवेळी शिवगड गावातही बनावट दारू प्यायल्याने मनोज यांचाही मृत्यू झाला आहे. अमरपाल यांचा जॉली ग्रँट हॉस्पिटलमध्ये मृत्यू झाला असून त्यांच्या काकांचा एम्स ऋषिकेशमध्ये मृत्यू झाल्याचे सांगण्यात येत आहे.
रुरकी दारु प्रकरण : 2019 मध्ये हरिद्वार जिल्ह्यातील रुरकीमध्ये विषारी दारूच्या सेवनामुळे 40 हून अधिक लोकांचा मृत्यू झाला होता. त्यानंतर पोलिसांनी अनेकांवर कारवाईही केली. 40 जणांच्या मृत्यूनंतर पोलीस-प्रशासन झोपेतून जागे होईल, असे मानले जात होते. मात्र त्यानंतरही या भागात सातत्याने विषारी दारुने लोक मृत्युमुखी पडण्याच्या घटना घडत आहेत. या घटनांमधून प्रशासनाने कोणताही बोध घेतला नसल्याचे दिसून येत आहे.