नवी दिल्ली -रामसर करारांतर्गत आणखी ( Ramsar contract ) पाच भारतीय स्थळांना आंतरराष्ट्रीय महत्त्वाची ( Ramsar wetland list india ) पाणथळ जागा म्हणून मान्यता देण्यात आली असल्याची माहिती केंद्रीय पर्यावरण मंत्रालयाने मंगळवारी दिली. यामुळे देशातील एकूण ( Ramsar wetland news ) पाणथळ स्थळांची संख्या 54 झाली आहे. ज्या पाच नवीन स्थळांचा रामसर यादीत समावेश करण्यात आला आहे त्यात तामिळनाडूमधील तीन, मिझोराम आणि मध्य प्रदेशातील प्रत्येकी एक साइट समाविष्ट आहे, अशी माहिती मंत्रालयाने दिली.
हेही वाचा -वस्तुस्थिती मांडणे प्रसारमध्यामांची जबाबदारी, व्यावसायिक हितसंबंध बाजूला ठेवावे - सरन्यायाधीश रमणा
पाणथळ प्रदेशांचे आंतरराष्ट्रीय नेटवर्क विकसित करणे आणि त्यास टिकवून ठेवणे हे रामसर यादीचे उद्देश्य आहे. जे जागतिक जैविक विविधतेचे संवर्धन आणि मानवी जीवन टिकवून ठेवण्यासाठी त्यांच्या इकोसिस्टीमचे घटक, प्रक्रिया आणि लाभांच्या देखभालीच्या दृष्टीने महत्वाचे आहे.तामिळनाडूमधील करिकिली पक्षी अभयारण्य, पल्लिकारणाई मार्श रिझर्व्ह फॉरेस्ट आणि पिचावरम खारफुटी, मध्य प्रदेशातील साख्य सागर आणि मिझोरामच्या पाला पाणथळ प्रदेशाला रामसर यादीत स्थान मिळाले आहे, अशी माहिती केंद्रीय पर्यावरण मंत्री भूपेंद्र यादव यांनी दिली.
भारताने स्वातंत्र्याच्या ७५ व्या वर्षी देशातील ७५ आर्द्र प्रदेशांना रामसर टॅग मिळवून देण्याचे लक्ष्य डोळ्यापुढे ठेऊन चालत असल्याचे, अधिकाऱ्यांनी सांगितले. रामसर करार हा पाणथळ जमिनींचे संवर्धन आणि त्याचा सुज्ञ वापर यासंबंधीचा आंतरराष्ट्रीय करार आहे. कॅस्पियन समुद्रातील रामसर या इराणी शहराच्या नावावरून या कराराला हे नाव देण्यात आले आहे. येथे 2 फेब्रुवारी 1971 रोजी करार झाला होता.
हेही वाचा -Earthquake in Philippines - उत्तर फिलीपिन्समध्ये 7.0 रिश्टर स्केलचा भूकंप, इमारतींना नुकसान