दंतेवाडा (छत्तीसगड) -देशात कोरोना व्हायरसच्या संसर्गाची दुसरी लाट आली आहे. अशा कठीण काळात फ्रंटलाईन वॉरियर्स आपला जीव धोक्यात घालून आपली सेवा बजावत आहेत. यादरम्यान, पाच महिन्याची गर्भवती पोलीस उप-अधिक्षकही या लढ्यात रस्त्यावर उतरली आहे.
दंतेश्वरी महिला कमांडोच्या उपअधिक्षक शिल्पा साहू या पाच महिन्यांच्या गर्भवती आहेत. पण त्या आपली जबाबदारी ओळखून रस्त्यावर उतरल्या आहेत. रस्त्यावर विनाकारण फिरणाऱ्या लोकांना त्या घरीच राहण्याचा सल्ला देत आहेत.
दंतेवाडा जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढल्याने प्रशासनाने लॉकडाऊन लावला आहे. पण काही नागरिक विनाकारण रस्त्यावर फिरताना पाहायला मिळत आहेत. या नागरिकांचा बंदोबस्त करण्यासाठी शिल्पा साहू या रस्त्यावर उतरल्या आहेत. त्या विनाकारण रस्त्यावर फिरणाऱ्या तसेच विना मास्क भटकणाऱ्यांवर कारवाई करत आहेत. शिल्पा यांनी सांगितलं की, 'तुम्ही सुरक्षित राहाव, यासाठी आम्ही रस्त्यावर उतरलो आहोत.'