तिरुअनंतपुरम ( केरळ ) : तिरुअनंतपुरम जिल्ह्यातील कल्लंबलमजवळील चथनपारा ( Chathanpara near Kallambalam in Thiruvananthapuram district ) येथे शनिवारी एका कुटुंबातील पाच जणांचा रहस्यमय परिस्थितीत मृत्यू झाल्याचे आढळून ( Five Family Members Found Dead ) आले. मणिकुत्तन, त्यांची पत्नी संध्या, त्यांची मुलगी अमेय आणि मुलगा अजिश, संध्याच्या आईची बहीण देवकी अशी मृतांची नावे आहेत.
कर्जबाजारी झाल्याने उचलले पाऊल :पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मणिकट्टन एका खोलीत लटकलेल्या अवस्थेत आणि इतरांनी विष प्राशन केल्याचे आढळून आले. मणिकट्टन कर्जबाजारी होते आणि ते चथनपारा येथे एक छोटेसे दुकान चालवत होते. दोन दिवसांपूर्वी पंचायत अधिकाऱ्यांनी त्याला मणिकुत्तनचे जेवणाचे दुकान बंद करण्यास सांगितले. त्यामुळे दोन दिवस दुकाने बंद होती.