हातरसयेथील सादाबाद रोडवरील सेंट फ्रान्सिस शाळेजवळ एका डंपरने शुक्रवारी दुपारी दीडच्या सुमारास गंगाजल वाहून नेणाऱ्या अनेक कावड यात्रेकरूंना चिरडले. त्यापैकी 6 जणांचा मृत्यू ( Five Pilgrims killed ) झाला. तर अन्य दोघे गंभीर जखमी ( Critical Condition ) झाले आहेत. आग्रा एडीजी राजीव कृष्णा यांनी सांगितले की, आम्हाला डंपरच्या चालकाची माहिती मिळाली आहे. तो लवकरच पकडला जाईल.
Six Killed In Accident : डंपरच्या धडकेत सहा कावड यात्रेकरू ठार - पाच कावड यात्रेकरू ठार
हातरस जिल्ह्यातील सादाबाद परिसरात डंपरने कावड यात्रेकरूंना दिलेल्या धडकेत सहा यात्रेकरू ठार ( Five Pilgrims killed ) झाले. या अपघातात अन्य दोन भाविक जखमी झाले आहेत. दोघांची भाविकाची प्रकृती गंभीर ( Critical Condition ) असल्याने त्यांना पुढील उपचारासाठी आग्रा येथील रुग्णालयात पाठविण्यात आले आहे.
UP Accident
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसारहे कावड यात्रेकरू गंगाजल घेऊन हरिद्वारहून ग्वाल्हेरला जात होते. अपघाताची माहिती मिळताच पोलीस आणि प्रशासकीय अधिकारी घटनास्थळी दाखल झाले. दोन गंभीर जखमी भाविकांना उपचारासाठी आग्रा येथे पाठवण्यात आले. घटनेची माहिती मिळताच पोलिस अधिकारी घटनास्थळी पोहोचले. अपघातातील सर्व बळी हे बांगी खुर्द पोलीस स्टेशन, उटिला जिल्हा, ग्वाल्हेर, मध्य प्रदेश येथील रहिवासी असल्याचे सांगण्यात येत आहे.
Last Updated : Jul 23, 2022, 10:42 AM IST