नवी दिल्ली :पोलीस उपायुक्त प्रणव तायल ( Police Pranav Tayal ) यांनी सांगितले की,सुरक्षारक्षकाला मारहाणीची घटना इंडिया गेट संकुलातील चिल्ड्रन पार्कची ( Children Park India Gate ) आहे. याठिकाणी काही विक्रेते आणि रक्षक यांच्यात हाणामारी झाल्याचे सांगण्यात येत आहे. काही विक्रेते खाद्यपदार्थांची विक्री करत होते, त्यांना परवानगी नव्हती. यादरम्यान सुरक्षा रक्षकाने त्यांना इंडिया गेटजवळील जागा रिकामी करण्यास सांगितल्यावर त्यांच्यात हाणामारी सुरू झाली. येथे व्हेंडिंग झोन नाही, त्यामुळे गार्डने विक्रेत्यांना तेथून जाण्यास सांगितले. यानंतर काही विक्रेते संतप्त झाले आणि त्यांनी सुरक्षारक्षकांना लाठीमार करण्यास सुरुवात केली.या झटापटीत पाच सुरक्षा कर्मचारी जखमी झाले. ( Five Guards Injured In clash with vendors )
Five Guards Injured : इंडिया गेटजवळ विक्रेत्यांशी भांडण; पाच सुरक्षारक्षक जखमी - case was registered against the sellers
राजधानी दिल्लीतील इंडिया गेटजवळ ( India Gate ) दुकानदारांसोबत झालेल्या चकमकीत पाच सुरक्षा कर्मचारी जखमी झाले आहेत. पोलिसांनी बुधवारी ही माहिती दिली.शाहजहान रोडवरील चिल्ड्रन पार्कमध्ये ( Children Park India Gate ) मंगळवारी ही घटना घडली.या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे, ज्यामध्ये काही लोक गार्डला घेऊन जाताना दिसत आहेत. पोलिसांनी या प्रकरणी एफआयआर नोंदवला असून या प्रकरणाचा तपास सुरू आहे. ( Five Guards Injured In clash with vendors )
विक्रेत्यांविरुद्ध गुन्हा दाखल : ( case was registered against the sellers ) यामध्ये इतर काही सुरक्षारक्षकही मदतीला आले आणि तेही जखमी झाले. पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून आरोपींची ओळख पटविण्याचे प्रयत्न सुरू आहेत. पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, याप्रकरणी विक्रेत्यांविरुद्ध संबंधित कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून त्यांना अटक करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, या घटनेत एकूण 5 सुरक्षारक्षक जखमी झाले आहेत.
व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल :(video of the encounter went viral on social media ) तायल म्हणाले की, कलम 186 (लोकसेवकाला त्याच्या कर्तव्यात अडथळा आणणे), 353 (लोकसेवकाला त्याच्या कर्तव्यापासून परावृत्त करण्यासाठी प्राणघातक हल्ला ), 332 (लोकसेवकाला त्याच्या कर्तव्यापासून परावृत्त करणे) ही कलमे लागू करण्यात आली आहेत. या प्रकरणाचा तपास सुरू आहे. या भांडणाचे व्हिडिओही सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.