जयपूर :राजस्थानमधील जयपूर-अजमेर महामार्गावरील एका रेस्टॉरंटमध्ये पोलीस कर्मचारी आणि रेस्टॉरंट कर्मचाऱ्यांमध्ये हाणामारी झाली. या हाणामारीचा सीसीटीव्ही व्हिडिओ व्हायरल आहे. या मारहाणीच्या प्रकरणी आयएएस, आयपीएस अधिकाऱ्यांसह 5 जण निलंबित करण्यात आले आहे. रविवारी उशिरा रात्री जयपूर-अजमेर महामार्गावरील या रेस्टॉरंटमध्ये पोलीस कर्मचारी आणि हॉटेल स्टाफमध्ये हाणामारी झाली होती. या हाणामारीचे दृश्य सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली ते आता व्हायरल झाली आहेत.
अधिकाऱ्यांचे निलंबन : या प्रकरणी अधिकाऱ्यांवर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. अजमेर विकास प्राधिकरणाचे आयुक्त गिरीधर आणि गंगापूर शहर पोलिसांचे विशेष कर्तव्य अधिकारी सुशील कुमार बिश्नोई अशी निलंबित करण्यात आलेल्या अधिकाऱ्यांची नावे आहेत. तर पटवारी नरेंद्र सिंग दहिया, हवालदार मुकेश कुमार आणि एलडीसी हनुमान प्रसाद चौधरी अशी इतर निलंबित करण्यात आलेले कर्मचाऱ्यांची नावे आहेत. या घटनेविषयी कारवाई म्हणून अजमेरचे एसपी चुना राम जाट यांनी एएसआय रूपराम, कॉन्स्टेबल गौतम आणि कॉन्स्टेबल मुकेश यांची पोलिस लाईन्समध्ये बदली करण्यात आली आहे. शिवाय या घटनेत त्यांचा सहभाग तपासण्यासाठी त्यांची विभागीय चौकशी सुरू करण्यात आली आहे.
हॉटेल कर्मचाऱ्यांना मारहाण : दरम्यान पोलिसांनी या प्रकणाचा पुढील तपास एडीजी (दक्षता) व्हिजिलन्सकडे सोपवण्यात आला आहे. हॉटेल कर्मचार्यांवर झालेल्या हल्ल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर ही घटना उघडकीस आली आहे. जून 11 तारखेच्या रात्री ही घटना घडल्याचे सांगण्यात येत आहे. दरम्यान अधिकाऱ्यांनी एका वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याकडे या प्रकरणाच्या तपासाची जबाबदारी सोपवली आहे. रविवारी रात्री 3 ते 4 पोलिसांसह एका आयपीएस अधिकाऱ्याने हॉटेल कर्मचाऱ्यांना मारहाण केल्याचा आरोप हॉटेल व्यवस्थापनाने केला आहे. या मारहाणप्रकरणी गेगल पोलीस ठाण्यात अज्ञात पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.