महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

कंटेनरची कारसह दुचाकीला धडक, पाच जण ठार - कंटेनर दुचाकी अपघात

कंटेनरने प्रथम तीन दुचाकीस्वारांना धडक दिल्याचे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले. यानंतर कारलाही धडक दिली. यादरम्यान २ जणांचा जागीच मृत्यू झाला. तर अन्य तिघांचा झालावाड ( Jhalawar accident ) येथे उपचारादरम्यान मृत्यू झाला. अपघाताची माहिती मिळताच पोलीस अधिकारी घटनास्थळी दाखल झाले. जखमींना १०८ रुग्णवाहिकेच्या मदतीने झालावाड येथील एसआरजी रुग्णालयात पाठवण्यात आले. आता सर्व मृतांची ओळख पटवली जात आहे.

अपघात
अपघात

By

Published : Jun 11, 2022, 9:04 PM IST

जयपूर ( झालावार ) - जिल्ह्यातील अस्नावर पोलीस ठाण्याच्या अकोडिया गावाजवळ भीषण अपघात ( Five died in road accident in Jhalawar ) झाला आहे. या अपघातात पाच जणांचा मृत्यू झाला आहे. तर 2 जण गंभीर जखमी झाले आहेत. जखमींवर झालावाड येथील एसआरजी रुग्णालयात ( treatment in SRG hospital ) उपचार सुरू आहेत.

कंटेनरने प्रथम तीन दुचाकीस्वारांना धडक दिल्याचे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले. यानंतर कारलाही धडक दिली. यादरम्यान २ जणांचा जागीच मृत्यू झाला. तर अन्य तिघांचा झालावाड ( Jhalawar accident ) येथे उपचारादरम्यान मृत्यू झाला. अपघाताची माहिती मिळताच पोलीस अधिकारी घटनास्थळी दाखल झाले. जखमींना १०८ रुग्णवाहिकेच्या मदतीने झालावाड येथील एसआरजी रुग्णालयात पाठवण्यात आले. आता सर्व मृतांची ओळख पटवली जात आहे. यासोबतच कंटेनर Police probe in road accident ) कुठून येत होता आणि कुठे जात होता, याची माहिती मिळावी यासाठी कंटेनर चालकाचा शोध घेण्यात येत आहे. याबाबत अद्याप कोणतीही माहिती मिळालेली नाही. पोलिसांनी या संपूर्ण प्रकरणाचा तपास सुरू केला आहे.

सीएम गेहलोत यांनी ट्विट करून व्यक्त केले शोक: राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांनी झालावाडमधील रस्ता अपघाताबाबत ट्विट करून शोक व्यक्त केला आहे. त्यांनी ट्विटमध्ये लिहिले आहे की, झालावाडमधील असनावर भागात NH 52 वर झालेल्या रस्ते अपघातात 5 लोकांचा मृत्यू होणे अत्यंत दुःखद आहे. शोकाकुल कुटुंबातील सदस्यांना माझ्या मनापासून संवेदना. ईश्वर त्यांना हा आघात सहन करण्याची शक्ती देवो. मृतांच्या आत्म्याला शांती लाभो आणि जखमींना लवकरात लवकर बरे होवो हीच सदिच्छा.

ABOUT THE AUTHOR

...view details