महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

Haridwar Ardh Kumbh Case : पटियाला हाऊस न्यायालयाने पाच आरोपींना ठरविले दोषी, 30 मे रोजी देण्यात येणार निकाल - हरिद्वार अर्धकुंभ

पाच जणांवर हरिद्वारमधील अर्धकुंभवर हल्ला करण्याकरिता कट रचल्याचा आरोप आहे. न्यायालयाने दोषी ठरविलेल्या आरोपींमध्ये अखलाकुर रहमान, मोहं. अझीमुशन, मोहम्मद. मेराज, मो. ओसामा आणि मोहसीन इब्राहिम सय्यद यांचा समावेश आहे. एनआयएने त्यांच्यावर भारतीय दंड संहितेच्या कलम 120B अंतर्गत गुन्हेगारी कट रचल्याचा आरोप केला होता.

पटियाला हाऊस न्यायालय
पटियाला हाऊस न्यायालय

By

Published : May 20, 2022, 10:56 PM IST

नवी दिल्ली- दिल्लीच्या पटियाला हाऊस न्यायालयाने ( Patiala House court ) जानेवारी 2016 मध्ये हरिद्वार अर्धकुंभवर हल्ला केल्याबद्दल ( Haridwar Ardh Kumbh ) आणि दिल्ली-एनसीआरमध्ये आयएस नेटवर्क उभारल्याबद्दल पाच जणांना दोषी ( Five convicted for targeting Haridwar) ठरवले आहे. अतिरिक्त सत्र न्यायाधीश प्रवीण सिंह यांनी या दोषींच्या शिक्षेवर ३० मे रोजी निकाल देण्याचे आदेश दिले आहेत.

पाच जणांवर हरिद्वारमधील अर्धकुंभवर हल्ला करण्याकरिता कट रचल्याचा आरोप आहे. न्यायालयाने दोषी ठरविलेल्या आरोपींमध्ये अखलाकुर रहमान, मोहं. अझीमुशन, मोहम्मद. मेराज, मो. ओसामा आणि मोहसीन इब्राहिम सय्यद यांचा समावेश आहे. एनआयएने त्यांच्यावर भारतीय दंड संहितेच्या कलम 120B अंतर्गत गुन्हेगारी कट रचल्याचा आरोप केला होता. जुलै 2016 मध्ये एनआयएने 6 आरोपींविरुद्ध आरोपपत्र दाखल केले होते. या पाच दोषींशिवाय शफी आरमारविरुद्धही आरोपपत्र दाखल करण्यात आले होते. मात्र तो अजूनही फरार आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details