महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

Five children died in Aurangabad : तलावात पोहण्यासाठी गेलेल्या 5 मुलांचा तलावात बुडून मृत्यू

Five children died in Aurangabad औरंगाबादमध्ये दुर्दैवी दुर्घटना घडली आहे. राखी बांधून तलावात पोहण्यासाठी गेलेल्या 5 मुलांचा बुडून मृत्यू झाला आहे. तलावात त्यांना पाण्याचा अंदाज न आल्यानं पाचही मुलांना जलसमाधी मिळाली.

Five children died in Aurangabad
5 मुलांचा तलावात बुडून मृत्यू

By ETV Bharat Marathi Team

Published : Aug 31, 2023, 9:36 PM IST

औरंगाबादFive children died in Aurangabad : औरंगाबादमध्ये तलावात बुडून 5 मुलांचा मृत्यू झल्यानं एकच खळबळ उडाली आहे. जिल्ह्यातील सलैया पोलीस स्टेशन हद्दीतील सोनारचक गावात ही घटना घडली. तलावात आंघोळ करताना हा अपघात झाला. सर्व मुलांचे मृतदेह बाहेर काढण्यात आले आहेत. पोलिसांनी मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवून प्रकरणाचा तपास सुरू केला आहे.

राखी बांधून मुलं आंघोळीला गेली :मिळालेल्या माहितीनुसार रक्षाबंधन निमित्तानं आधी सर्व मुलांनी राखी बांधली, नंतर मित्रांसोबत ते जवळच्या तलावात आंघोळीसाठी गेले होते. तलावात त्यांना पाण्याचा अंदाज न आल्यानं सर्व मुलांचा बुडून मृत्यू झाला. काही वेळानं एक गावकरी तिथं पोहोचल्यावर त्याला मुलांचे कपडे तिथ पडलेले दिसले. त्यानं आजूबाजूला बघितलं असता तिथं मुलं आढळून आले नाहीत.

  • सर्वांचे मृतदेह बाहेर काढले : गावकऱ्यानं या घटनेची माहिती तात्काळ गावकऱ्यांना दिली. त्यानंतर गावकऱ्यांनी तलावाकडं धाव घेत मुलांचा शोध सुरू केला. तेव्हा तलावात मुलांचे मृतदेह आढळून आले. या घटनेमुळं परिसरातील नागरिकांनी तलावाजवळ एकच गर्दी केली होती. एकाच गावातील मुलांच्या मृत्यूमुळं परिसरातील नागरिकांनी हळहळ व्यक्त केली आहे.

आंघोळ करताना बुडून या मुलांचा मृत्यू :तलावात बुडून मृत्यू झालेल्या मुलांमध्ये उदय कुमार यांचा १० वर्षांचा मुलगा धीरज तसंच १२ वर्षांचा मुलगा नीरज, सुखेंद्र यादव यांचा मुलगा प्रिन्स कुमार (१० वर्ष), अनुज यादव यांचा १२ वर्षांचा मुलगा गोलू. जोगिंदर यादव यांचा मुलगा अमित कुमार (8 वर्ष) यांचा मृतामध्ये समावेश आहे. हे सर्व मुलं बिहारच्या औरंगाबाद जिल्ह्यातील सलैया पोलीस ठाण्याच्या हद्दीतील सोनारचक गावचे रहिवासी होते.

हेही वाचा -

  1. Assam Flood : आसाममध्ये पावसाचा हाहाकार झाल्यानं पूरस्थिती गंभीर; मृतांचा वाढला आकडा

ABOUT THE AUTHOR

...view details