महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

आग्र्याजवळ ट्रकला धडकल्यानंतर कारला आग; पाचही प्रवाशांचा होरपळून मृत्यू - आग्रा अपघात लेटेस्ट न्यूज

सेंट्रल लॉक सिस्टीममुळे अपघातानंतर कारमधील लोक आतमध्ये अडकले. या धडकेनंतर लागलेल्या आगीत कार जळून खाक झाली. यात प्रवाशांचा भाजून मृत्यू झाला, अशी माहिती पोलीस उपअधीक्षकांनी दिली.

यमुना द्रुतगती मार्ग अपघात न्यूज
यमुना द्रुतगती मार्ग अपघात न्यूज

By

Published : Dec 22, 2020, 7:29 PM IST

आग्रा (उत्तर प्रदेश) - उत्तर प्रदेशच्या आग्र्याजवळील यमुना द्रुतगती मार्गावर डिझेल वाहून नेणाऱ्या टँकर ट्रकला कारने धडक दिल्याने पाच जणांचा मृत्यू झाला. मंगळवारी ही घटना घडली.

एटमादपूरच्या पोलीस उपअधीक्षक अर्चना सिंह म्हणाल्या की, भरधाव वेगात जात असताना ट्रकने चुकीचे वळण घेतले आणि त्यानंतर आग्र्याहून लखनौकडे जाणाऱ्या कारने त्याला जोरदार धडक दिली.

आग्र्याजवळ यमुना द्रुतगती मार्गावर अपघात

सेंट्रल लॉक सिस्टीममुळे अपघातानंतर कारमधील लोक आतमध्ये अडकले, असे त्या म्हणाल्या. या धडकेनंतर लागलेल्या आगीत कार जळून खाक झाली. यात प्रवाशांचा भाजून मृत्यू झाला.

हेही वाचा -जम्मू-काश्मीर निवडणुकांमध्ये उभी आहे पाकिस्तानी महिला; अपक्ष उमेदवार म्हणून लढणार..

सिंह म्हणाल्या की, यमुना एक्स्प्रेस वेवरील एका बूथच्या एका कर्मचाऱ्याने अपघाताची माहिती पोलिसांना दिली आणि अग्निशमन दलाला पाचारण करण्यात आले. आगीवर नियंत्रण मिळवण्यात आले. मात्र, तोपर्यंत कारमधील पाचही प्रवाशांच्या गंभीररीत्या होरपळून गेले होते.

अपघातानंतर ट्रक चालक घटनास्थळावरून पळून गेला. त्याला पकडण्यासाठी शोध सुरू असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.

हेही वाचा -नातं सात जन्माचं : फेरे घेण्याआधीच वधूचा अपघात... पाय निकामी झाल्यानंतर त्याने केलं 'प्रपोज'

ABOUT THE AUTHOR

...view details