फाल्गुनी नायर - (Falguni Nayar Business woman )फाल्गुनी नायर या भारतातीत यशस्वी महिला उद्योजिका ( Women Entrepreneurs in India ) आहे. आय आय एम अहमदाबाद मधून मॅनॅजमेण्टचं शिक्षण पूर्ण करून फाल्गुनी नायर यांनी आपल्या करिअरची सुरुवात A. F. Ferguson या कंपनीतून केली. त्यानंतर कोटक महिंद्रा फायनान्स मध्ये काम करण्यास सुरुवात केली. कंपनीची लंडन येथे शाखा सुरु करून अल्पावधीतच अमेरिकेत देखील ऑफीस स्थापन केले. भारतात परत येऊन २०१२ पर्यन्त कोटक महिंद्रा फायनान्स मध्येच काम करत राहिल्या.अमेरिकेत असताना त्यांच्या निदर्शनास आलेली एक गोष्ट म्हणजे तेथे असलेल्या सौंदर्यप्रसाधनांची मोठमोठी आणि महागडी दुकाने. त्यामुळे भारतामध्ये सौंदर्यप्रसाधने सर्वच स्तरातील ग्राहकांना योग्य दरात आणि घरपोच उपलब्ध करून देणे हा एक विचार त्यांच्या या स्टार्टअप मागे मुख्यत्वे होता. इतक्या वर्षांच्या कॉर्पोरेटमधल्या कामाचा अनुभव असताना २०१२ मध्ये त्यांनी आपल्या उत्तम अश्या करिअरला राम राम केला आणि 'नायका' या ईकॉमर्स स्टार्टअप कंपनीची स्थापना केली. यामध्ये सौंदर्यप्रसाधने, पर्सनल केअर तसेच आरोग्यविषयक प्रोडक्ट्स चा समावेश होता. सर्वच उत्पादने ऑनलाइन आणि वाजवी दरामध्ये उपलब्ध करून देण्यात आली. त्यामुळे अल्पावधीतच नायका ग्राहकांच्या पसंतीस उतरला.
निरु शर्मा -कंप्युटर सायन्स मध्ये इंजिनीअरिंग ची डिग्री संपादन करुन निरु शर्मा ( Niru Sharma ) यांनी कार्नेगी मेलॉन युनिवर्सिटी मधुन मॅनॅजमेण्टचं शिक्षण पूर्ण केले. इन्फिबिम या कंपनिच्या त्या सह संस्थापिका आहेत. इन्फिबिम या ई-कॉमर्स कंपनीची स्थापना २००७ साली झाली. हि कंपनी मुख्यत्वे पुस्तके, इलेक्ट्रॉनिक्स आणि ऑटोमोबाइल या प्रकारचे प्रोडक्ट्स योग्य दरात आणि घरपोच उपलब्ध करुन देते. इन्फिबिम हि कंपनी बॉम्बे स्टॉक एक्सचेंज आणि नॅशनल स्टॉक एक्सचेंज मध्ये लिस्टेड आहे त्याचबरोबर IPO फाईल करणारी इन्फिबिम हि भारतातील पहिली इकॉमर्स कंपनी बनली आहे.
राधिका घाई अग्रवाल -वॉशिंग्टन युनिवर्सिटी मधून मॅनॅजमेण्टचं शिक्षण पूर्ण करुन स्टॅनफोर्ड मधुन त्यांनी वेब २.० आणि क्रिएटिव्ह राइटिंगचं शिक्षण घेतलं. राधिका घाई अग्रवाल या शॉपक्लूझ कंपनीच्या सह संस्थापिका आहेत. त्याचबरोबर युनिकॉर्न क्लब मध्ये जाणार्या ( Radhika Ghai Agarwal ) त्या पहिल्या भारतीय महिला उद्योजिका आहेत. शॉपक्लूझ कंपनी हि त्यांची पहिली कंपनी नसुन त्यांनी त्यापूर्वी फॅशनक्लूझ नावाची कंपनी परदेशी महिलांसाठी सुरु केली होती. शॉपक्लूझ हि अमॅझॉन, फ्लीपकार्ट प्रमाणेच एक इ-कॉमर्स कंपनी आहे.