महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

Human Trafficking In Dhamtari : धमतरी येथे मानवी तस्करी उघड, पाच आरोपी अटक, तस्करांचा महाराष्ट्राशी संबंध - मानवी तस्करीचा पर्दाफाश

छत्तीसगडमधील धमतरी जिल्ह्यातील सिहावा पोलिसांनी मानवी तस्करीच्या एका मोठ्या प्रकरणाचा खुलासा केला आहे. या प्रकरणी महाराष्ट्र, मध्य प्रदेश आणि ओडिशातील ५ जणांना अटक करण्यात आली आहे. त्याचबरोबर 3 फरार आरोपींचा शोध सुरू आहे. रविवारी सर्व आरोपींना अटक करण्यात आली.

Human Trafficking In Dhamtari
धमतरी येथे मानवी तस्करी उघड

By

Published : Mar 6, 2023, 7:45 PM IST

प्रतिक्रिया देताना एसडीओपी मयंक रणसिंह

धमतरी :धमतरीच्या सिहावा पोलिसांनी खुलासा केला की, 'गदिया पारा गावात राहणारा 20 वर्षीय पुरुष आणि दोन 18 वर्षांच्या मुलींची आर्थिक परिस्थिती चांगली नव्हती. ते कामाच्या शोधात होते. तेव्हा गावात राहणाऱ्या चिंताराम कोर्रम या व्यक्तीने तिघांनाही आपल्या सापळ्यात घेतले. कामाची काळजी करू नका, महाराष्ट्रात या तिघांनाही काम मिळेल, असे चिंतारामने सांगितले. चिंताराम त्यांना सोबत घेऊन गेला. 28 फेब्रुवारी रोजी महाराष्ट्रातील आमगाव येथे नेले. तेथून रात्री एक महिला व दोन पुरुष कारमध्ये आले. सगळ्यांना गाडीत बसवले. मात्र गाडीत बसल्यानंतर तरुण-तरुणींनी गाडीत बसलेल्या व्यक्तीचे ऐकले असता, त्यांना संशय आला.



प्लॅन बनवून तरुण-तरुणी पळून गेले : पोलिसांच्या म्हणण्यानुसार, 'कामाच्या शोधात निघालेल्या तरुण-तरुणींना आपल्यासोबत काहीतरी गडबड होऊ शकते, असा अंदाज आल्यावर त्यांनी सर्वांनी एक चतुराईने योजना आखली. वाटेत मधोमध कार थांबवून पळून जाण्याचा प्लॅन होता. त्यामुळे तिघांनीही गाडी थांबवण्याचा बहाणा केला. दरम्यान तिघेही गाडीतून खाली उतरून जंगलात पळून गेले. यानंतर तिघांनीही जवळच्या गावात जाऊन लोकांची मदत मागितली आणि सिहावा पोलिसांना माहिती दिली. माहिती मिळाल्यानंतर तिघेही कसेतरी 5 ​​दिवसांनी सिहावा येथे पोहोचले आणि पोलिस ठाण्यात तक्रार दिली.

चिंतारामला अटक : पोलिसांनी गावातील चिंतारामला अटक केली, तेव्हा त्याने तिघांचाही सौदा ५ लाख रुपयांना केल्याचे समोर आले. या टोळीत परराज्यातील लोकांचा समावेश असून; या गुन्ह्यात पोलिसांनी तरुण-तरुणींना पळवून लावणाऱ्या चिंतारामसह ५ जणांना अटक केली आहे. यातील तीन आरोपी महाराष्ट्रातील आहेत. या प्रकरणात आणखी तीन आरोपींचा समावेश आहे. ज्यांचा पोलीस शोध घेत आहेत. सर्व आरोपींना रविवारी, ५ मार्च रोजी उशिरा अटक करण्यात आली. याआधी देखील अश्या अनेक घटनांची नोंद अनेक राज्यात झाली आहे. तस्करांचा महाराष्ट्राशी संबंध असल्याने पोलिस दोन्ही राज्यात पूढील तपास करित आहेत.

हेही वाचा : Liquor Illegal Stock Seized In Chandrapur: मोठ्या दारू विक्रेत्याची ग्रामीण भागात तस्करी?; होळीच्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी केली कारवाई

ABOUT THE AUTHOR

...view details