पणजी (गोवा) - पणजी शहराजवळच्या काकरा गावातील संतोष गाऊसो हा भारतातील एकमेव मच्छिमार असेल, कि जेव्हा तौक्ते चक्रीवादळ गोव्याच्या किनारपट्टीला धडकणार असा इशारा हवामान खाते देत असताना तो अजिबात चिंतेत नव्हता. त्याच्याकडे या वादळात गमावण्यासारखे काहीच नव्हते. तो गेली दोन वर्ष या भागात झालेल्या एका वादळाचा सरकार दप्तरी शोध घेत आहे. त्याची हरलेली लढाई आजही त्याने जमेल तशी सुरु ठेवली आहे.
सर्वस्व गमावलेला मच्छिमार दोन वर्षापासून 'त्या' वादळाचा सरकारी दफ्तरी घेत आहे शोध - Fishermen damage by cyclone in goa
पणजी शहराजवळच्या काकरा गावातील एक मच्छिमार असा होता ज्याला हवामान विभागाने दिलेल्या तौक्ते चक्रीवादळाच्या इशाऱ्याने चिंता नव्हती. कारण या वादळात गमावण्यासारखे त्याच्याकडे काहीच शिल्लक नव्हते. कारण त्याच्याकडे जे काही होते ते दोन वर्षापूर्वी आलेल्या वादळाने हिरावून नेले होते. मात्र या वादळाची सरकार दरबारी कोणतीच नोंद नसल्याने त्याला नुकसानभरपाई मिळालेली नाही. त्याची हरलेली लढाई आजही त्याने जमेल तशी सुरु ठेवली आहे.
काकरा गावात 25 जुलै, 2019 रोजी झाले होते वादळ -
25 जुलै, 2019 रोजी रात्री 2 वाजण्याच्या सुमारास अचानक वादळी वारे वाहू लागले. पणजी शहराजवळच्या काकरा आणि अन्य एका गावाला या वादळी वाऱ्यांचा जोरदार फटका बसतो. या वादळात संतोष गाऊसो यांचे माड कोसळतात. त्यात त्याच्या मच्छिमारीसाठी वापरात असलेल्या होड्या फुटून जातात. काकरा गावातील मच्छिमार संजय परेरा मच्छिमारीवर स्वतःचे कुटुंब चालवणारा संतोष गाऊसो यांची व्यथा सांगत होता. या वादळात त्याला इतका मोठा फटका बसतो कि, त्याच्या उदरनिर्वाहाची सर्वच साधने उध्वस्थ होतात. आज त्याला दुसऱ्याची होडी भाड्याने घेऊन स्वतःचा मच्छिमारी व्यवसाय चालवावा लागत आहे.