चेन्नई - देशांमध्ये व्हीआयपी आणि सेलिब्रिटींना कायदे धाब्यावर बसवून, नियमांची पायमल्ली करून विशिष्ट वागणूक देण्यात येते. त्याचा त्रास सामान्य नागरिकाला मोठ्या प्रमाणात होतो. याची उदाहरणे वाचायला, पाहायला मिळत असतात. चेन्नईच्या तिरुवल्लूर गावी अशाच राजकीय व्हीआयपी संस्कृतीचे दर्शन घडले आहे. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत असून मंत्र्यावर टीका केली जात आहे.
अनिथा राधाकृष्णन मच्छिमारांच्या बोटीत बसून समुद्रात पाहणी करायला गेले होते. मत्स्य व्यवसाय, पशूधन खात्यांचा कारभार आहे. पाहणी करून बोट किनाऱ्यावर आल्यावर अनिथा राधाकृष्णन यांचे पांढरेशुभ्र बूट समूद्राच्या पाण्यात भिजू नये म्हणून चक्क मच्छिमारांच्या कडेवर बसून त्यांनी किनारा गाठला. या घटनेचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर त्यांच्यावर टीकेची झोड उठली आहे. अनिता राधाकृष्णन यांनी अद्याप यावर प्रतिक्रिया दिली नाही.