FIRST OMICRON CASE DETECTED IN DELHI: दिल्लीत सापडला ओमायक्राॅनचा पहिला संशयित
दिल्लीत ओमायक्राॅनचा (omicron) पहिला संशयित सापडला आहे. 12 रूग्णांची जीनोम सिक्वेंसिंग चाचणी (Genome sequencing test) करण्यात आली असून त्यातील एका रूग्णाला ओमायक्राॅनची लागण झाल्याचा संशय व्यक्त होत आहे. त्याच्या चाचणीचा अहवाल उद्या येणार आहे.
नवी दिल्ली:केंद्रीय आरोग्य मंत्री सत्येंद्र जैन (Union Health Minister Satyendra Jain) यांनी म्हणले आहे की, बाहेरून येणाऱ्या सगळ्यांची चाचणी केली आहे. आत्ता पर्यंत 17 रूग्ण पाॅझिटीव्ह आहेत. लोकनायक जयप्रकाश नारायण रूग्णालयात उपचार सुरू आहेत. 6 जण त्यांच्या संपर्कात आलेले आहेत. 12 जणांची जीनोम सिक्वेसिंग टेस्ट केली आहे यातील 1 रूग्ण ओमायक्राॅनचा संशयीत आहे. त्याच्या चाचणीचा अहवाल उद्या येणार आहे. पण दिल्लीत ओमायक्राॅनचा पहिला संशयित सापडला असे आपण म्हणू शकतो.