महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

India Coordination Committee Meeting : 'इंडिया' समन्वय समितीची आज दिल्लीत बैठक; शरद पवारांच्या निवासस्थानी ठरणार 'रणनीती' - आज दिल्लीत पहिली बैठक

India Coordination Committee Meeting : 'इंडिया' आघाडीच्या समन्वय समितीची आज दिल्लीत पहिली बैठक पार पडणार आहे. या बैठकीत आगामी निवडणुकीची रणनीती ठरवण्यात येणार आहे. राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांच्या निवासस्थानी ही बैठक पार पडणार आहे.

India Coordination Committee Meeting
संग्रहित छायाचित्र

By ETV Bharat Marathi Team

Published : Sep 13, 2023, 12:51 PM IST

Updated : Sep 13, 2023, 1:02 PM IST

नवी दिल्ली India Coordination Committee Meeting : 'इंडिया' अर्थात 'इंडियन नॅशनल डेव्हलपमेंटल इन्क्लुझिव्ह अलायन्स' या विरोधी आघाडीच्या 14 सदस्यीय समन्वय समितीची आज दिल्लीत पहिली बैठक ( INDIA Meeting) आयोजित करण्यात आली आहे. या बैठकीत आगामी निवडणुकांची रणनीती, जागा वाटप आणि जाहीर सभा याबाबत चर्चा होणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. ही बैठक राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या दिल्लीतील निवासस्थानी होणार आहे.

संजय राऊत यांचा भाजपावर हल्लाबोल :शरद पवार यांच्या निवासस्थानी आज दिल्लीत को-ऑर्डिनेशन कमिटीची बैठक होत असल्याचं उबाठा गटाचे खासदार संजय राऊत यांनी आज मुंबईत सांगितलं. 'तृणमूल काँग्रेसचे अभिषेक बॅनर्जी आजच्या बैठकीला उपस्थित राहणार नाहीत. त्यांना आजच्याच दिवशीच ईडीचा समन्स आला आहे. हा भाजपचा रडीचा डाव आहे. ही बदल्याची कारवाई आहे. अभिषेक बॅनर्जी यांच्यावर दबाव टाकून सूडबुद्धीचं राजकारण केलं जात आहे. आमच्या कमिटीमधील हेमंत सोरेन, अभिषेक बॅनर्जी आणि माझ्या स्वतःवर सुद्धा दबाव आहे. आम्ही यातून एकच मार्ग काढला आहे. काही झालं तरी या दबावापुढे झुकायचं नाही. त्यामुळे देशाला एक वेगळा संदेश जाईल. त्यांना आजच्या बैठकीला उपस्थित राहता येऊ नये, म्हणून ईडीनं समन्स बजावलं आहे. लोकसभेच्या जागा वाटपात कुठलीही अडचण येणार नाही. कारण, आमची लढाई हुकूमशाही उलटून टाकण्यासाठी आहे' असं संजय राऊत यांनी यावेळी सांगितलं.

राष्ट्रीय लोकशाही आघाडीचा सामना करण्यासाठी 'इंडिया' :राष्ट्रीय जनता दलाचे नेते (RJD Leader) नेते मनोज झा यांनी आज दिल्लीत समन्वय समितीची पहिली बैठक होत असल्याचं सांगितलं. पुढील निवडणूक प्रचार आणि जाहीर सभांचं वेळापत्रक ठरवण्यावर 'इंडिया' लक्ष केंद्रित करणार असल्याचं मनोज झा यावेळी म्हणाले. पुढील लोकसभेत भारतीय जनता पक्षाच्या नेतृत्वाखालील राष्ट्रीय लोकशाही आघाडीचा (NDA) सामना करण्यासाठी विरोधी पक्षांनी 'इंडिया' ही विरोधी आघाडी स्थापन केल्याचं त्यांनी यावेळी सांगितलं. नुकत्याच झालेल्या 'इंडिया'मधील घटक पक्षांच्या नेत्यांच्या मुंबईत झालेल्या बैठकीत आगामी निवडणुकीतील कार्यक्रमांची रुपरेषा ठरवण्यासाठी 14 सदस्यीय समन्वय समितीची स्थापना करण्यात आल्याचंही त्यांनी यावेळी सांगितलं.

कोण कोण आहे समन्वय समितीत : 'इंडिया' आघाडीच्या समन्वय समितीमध्ये राष्ट्रवादीचे नेते शरद पवार, ममता बॅनर्जी यांच्याशिवाय काँग्रेस नेते केसी वेणुगोपाल, डीएमके नेते टीआर बाळू, जेएमएम नेते हेमंत सोरेन, शिवसेना यूबीटी नेते संजय राऊत, आरजेडी नेते तेजस्वी यादव, आप नेते राघव चढ्ढा, सपा नेते जावेद अली खान, जेडीयू नेते लालन सिंग, सीपीआय नेते डी राजा, नॅशनल कॉन्फरन्स नेते ओमर अब्दुल्ला, पीडीपी नेत्या मेहबुबा मुफ्ती आणि माकपच्या नेत्यांचा समावेश आहे.

हेही वाचा :

  1. Sharad Pawar On INDIA Bharat Contravesry: गेटवे ऑफ इंडियाला काय म्हणायचं- शरद पवारांचा थेट मोदींना प्रश्न
Last Updated : Sep 13, 2023, 1:02 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details