महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

श्रीराम प्राणप्रतिष्ठेच्या दिवशी काय परिधान करणार? पाहा कशी असणार वेशभूषा - श्रीराम प्रभू

Ayodhya Ram Mandir : रामनगरी अयोध्येमध्ये २२ जानेवारी रोजी श्रीरामाचा अभिषेक सोहळा होतोय. त्या सोहळ्यामुळं देशात सर्वत्र वातावरण भक्तीमय झाल्याचं पाहायला मिळतंय. अयोध्येतील अभिषेक सोहळा दिवशी रामलल्ला काय परिधाण करणार? याची पहिली झलक 'ईटीव्ही भारत'नं खास प्रेक्षकांसाठी आणली आहे.

Ramlala Dress
रामललासाठी पोशाख तयार

By ETV Bharat Marathi Team

Published : Jan 14, 2024, 10:36 PM IST

रामासाठी असा असणार पोशाख

अयोध्या Ayodhya Ram Mandir : अयोध्येत राम मंदिर तयार होत आहे. श्रीरामाच्या अभिषेक सोहळाची तयारी सध्या जोरात सुरू आहे. 22 जानेवारीला रामाला पाहण्यासाठी संपूर्ण जग आतुरतेनं वाट पाहत आहे. रामलल्लासाठी पितांबराचे कपडे तयार करण्यात आले आहेत. श्रीराम आणि त्यांच्या भावासाठी एकाच रंगाचे कपडेही बनवण्यात आले आहेत. प्राणप्रतिष्ठेच्या दिवशी संपूर्ण जगाला या कपड्यांमध्ये श्रीरामाचं दर्शन घडणार आहे. श्रीराम प्रभू पिवळ्या वस्त्रात मंदिरात विराजमान होणार आहेत.

पिवळे वस्त्र परिधान करणार : रामलल्लाच्या प्राणप्रतिष्ठेची तयारी पूर्ण झाली आहे. 22 जानेवारीला श्रीराम परिधान करणारे खास कपडे तयार करण्यात आले आहेत. या दिवशी पिवळा रंग शुभ मानला जातो. त्यामुळं या दिवशी श्रीराम प्रभू, सिता आणि सर्व भाव पिवळे वस्त्र परिधान करणार आहेत. याची झलक सध्या समोर आली आहे.

वस्त्र अतिशय सुंदरपणे तयार केले : शिंपी भागवत प्रसाद यांच्या कुटुंबानं राम लल्लाला पितांबर घालण्यासाठी वस्त्र तयार केले आहेत. भागवत प्रसाद सांगतात की, भगवान रामासाठी मलमलच्या कापडाचा पोशाख तयार करण्यात आला आहे. प्रभूंचा पोषाखही अतिशय सुबकपणे तयार करण्यात आला आहे. हे वस्त्र आम्ही गोटा, लेस, पन्ना आणि हिरा (कापड) यांनी सजवले आहे. शिंपी प्रसाद याचं म्हणणं आहे की, आम्ही शक्य तितके वस्त्र तयार करतो. जेणेकरून कापड सुंदर दिसावं. ठाकूरजींच्या कृपेनेच आम्हाला खूप बळ मिळत आहे. श्रीरामासाठी वस्त्र तयार करण्यात मोठा आनंद मिळतो.

बगा चोल आणि अंगवस्त्र तयार : प्राणप्रतिष्ठेच्या दिवशी संपूर्ण जग प्रभू रामाकडं पाहत असणार आहे. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदींसोबत मुख्यमंत्री योगी आदित्यनाथही उपस्थित राहणार आहेत. या दिवशी सर्वांना पिवळ्या कपड्यांमध्ये देवाचे दर्शन होणार आहे. कोणत्याही मंदिरात प्रभूची प्राणप्रतिष्ठा केली जाते तेव्हा परमेश्वराला पिवळे वस्त्र परिधान केले जातात. अशा परिस्थितीत हे वस्त्र आम्ही तयार केले आहे. यामध्ये अंगवस्त्र आणि बगा चोळ हे तयार करण्यात आले आहेत. ते तयार करण्यासाठी आम्ही वेगवेगळ्या ठिकाणांहून कापड आणलं आहे, असं शिंपी सांगतात.

कापड देशाच्या वेगवेगळ्या राज्यांतून आणले : भागवत प्रसाद यांनी सांगितलं की, 'कानपूर, दिल्ली, मुंबई आणि सुरतसह देशातील विविध राज्यांतून कापड आणले आहे. या कापडापासून आम्ही वस्त्र तयार केले आहेत. प्रभू रामाची वेशभूषा तयार करताना आम्ही अयोध्येतील अनेक मंदिरांमध्ये प्रभूची वेशभूषा तयार केली आहे. आम्ही येथे अनेक मंदिरांमध्ये कपडे पोहोचवतो.


रामलल्लाच्या कपड्यांचे वैशिष्ट्य

  • रामल्लांसाठी पोशाख अयोध्येत तयार केला आहे
  • प्राणप्रतिष्ठेच्या दिवशी भगवंताला पिवळ्या रंगाची वेशभूषा करण्याची तयारी सुरू आहे
  • पोशाख बनवण्यासाठीचे कापड देशातील अनेक राज्यांमधून आणले
  • रामासाठी बाराहून अधिक कपडे तयार
  • शिंपी भागवत प्रसाद यांनी रामासाठी कपडे तयार केलेत

हेही वाचा -

  1. चार हजार किमीचा प्रवास, 12 लाख वृक्षारोपण : जलस्त्री शिप्रा पाठक यांची अयोध्या ते रामेश्वरम अनोखी पदयात्रा नागपुरात
  2. दिव्यांग कारागिरांनी विणला अयोध्येच्या श्रीरामासाठी पैठणी शेला
  3. वाटलं होतं आंधळी झाले, पण राम मंदिरामुळं डोळ्याचं पारणं फिटलं; 96 वर्षीय शालिनीताईंचा अनुभव

ABOUT THE AUTHOR

...view details