नवी दिल्ली -कोरोनाचे संकट अजुनही संपलेले नाही. त्यातच बर्ड फ्ल्यूचा देशात पहिला मृत्यू दिल्ली एम्समध्ये झाला आहे. मृत्यू झालेला रुग्ण हा १२ वर्षांचा मुलगा आहे. त्याच्यावर दिल्ली एम्समधील बालरुग्ण विभागात H5N1 एव्हिययन इन्फ्लूएन्झाचे उपचार सुरू होते.
एम्सने माध्यमांना दिलेल्या माहितीनुसार १२ वर्षाच्या मुलावर रुग्णालयात डी५ वॉर्डमध्ये उपचार सुरू होते. त्याला एच१५एन १ रोगाची लागण झाल्याचे निदान झाले होते. मुलाला ल्यूकेमिया आणि न्यूमोनियाचा त्रास होता. त्याच्यावर दिल्ली एम्समधील अतिदक्षता विभागात उपचार सुरू होते. जे कर्मचारी मुलाच्या संपर्कात आले आहेत, त्यांनी कोणतीही लक्षणे दिसत आहेत की नाहीत यावर स्वत:वर देखरेख ठेवावी. जर फ्ल्यूची लक्षणे आढळली तर त्यांनी माहिती द्यायला पाहिजे.
हेही वाचा-सावधान! ...तर तीन अंशांनी वाढणार जागतिक तापमान! संशोधकांनी दिला इशारा
दरम्यान, जानेवारी २०२१ मध्ये देशातील आठहून अधिक राज्यांमध्ये बर्ड फ्लूचा मोठा फैलाव झाला होता.
असा आहे एव्हिन इन्फ्लूएन्झाचा धोका
एव्हिन इन्फ्लूएन्झा या विषाणुची मुख्यत: पक्ष्यांना लागण होते. मात्र, या विषाणुची मानवालाही लागण होऊ शकते. अशी लागण विशेषत: आजारी पक्षी संपर्कात आल्याने होते. हा संसर्गजन्य रोग एका माणसातून दुसऱ्या माणसात पसरू शकतो. जागतिक आरोग्य संघटनेच्या माहितीनुसार H5N1 चे मानवामध्ये दुर्मीळ प्रमाण आहे. तर मृत्यू दर हा ६० टक्क्यांहून अधिक आहे. H5N1 मुळे गंभीर फ्ल्यू होते. त्याचा मृत्यूदर अधिक असू शकतो. तज्ज्ञांच्या मते H5N1 विषाणून मानवामध्ये सहजरित्या पसरत नाही. तर एका माणसामधून दुसऱ्या माणसामध्ये विषाणू पसरणे हे असामान्य आहे.
चीनमध्ये बर्ड फ्ल्यूचा जगात पहिला मृत्यू जानेवारी २०२१ मध्ये-
चीनमध्ये सध्या बर्डफ्लूचे विविध स्ट्रेन अस्तित्वात आहेत. यांपैकी काही स्ट्रेन्सची लागण माणसांनाही यापूर्वी झाली आहे. मात्र, अशा घटना अगदी कमी समोर आल्या आहेत. एच१०एन३ या स्ट्रेनची माणसांना लागण होण्याची जगातील पहिलीच जानेवारी २०२१ मध्ये चीनध्ये घडली होती.