महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

Firing In Mumbai Jaipur Express : 'तो मानसिकदृष्ट्या आजारी होता, अधिकारी छळ करायचे';जवानाच्या कुटुंबियांचे धक्कादायक खुलासे - चेतनचे काका भगवान सिंह

मुंबई-जयपूर एक्स्प्रेसमध्ये गोळीबार करणाऱ्या आरपीएफ जवानाच्या काकांनी अधिकाऱ्यांवर गंभीर आरोप केले आहेत. जवान चेतन सिंह मानसिकदृष्ट्या आजारी होता. सहकाऱ्यांकडून त्याचा मानसिक छळ व्हायचा, असे आरोप त्यांनी केले.

Firing In Mumbai Jaipur Express
मुंबई जयपूर एक्स्प्रेसमध्ये गोळीबार

By

Published : Jul 31, 2023, 4:55 PM IST

Updated : Jul 31, 2023, 5:29 PM IST

पहा व्हिडिओ

हाथरस (उत्तर प्रदेश) :मुंबई-जयपूर एक्स्प्रेसमध्ये आरपीएफ जवान चेतन सिंहने गोळीबार करत चार जणांची हत्या केली. चेतन हा मूळचा उत्तर प्रदेशातल्या हाथरस जिल्ह्यातील रहिवासी आहे. या प्रकरणी आता चेतनचे काका भगवान सिंह यांनी काही धक्कादायक खुलासे केले आहेत.

जवान मानसिकदृष्ट्या अस्वस्थ होता : चेतन हा काही दिवसांपासून मानसिकदृष्ट्या आजारी होता. त्याची उलटसुलट ड्युटी लावण्यात आल्याने तो खूपच अस्वस्थ झाला होता. तो मानसिकदृष्ट्या अस्वस्थ असताना त्याला एवढे धोकादायक शस्त्र द्यायला नको होते, असे चेतनच्या काकांनी म्हटले आहे. तो मानसिकदृष्ट्या अस्वस्थ होता. यासोबतच वारंवार होणाऱ्या बदलीमुळे तो अधिकच अस्वस्थ झाला, असे त्याच्या काकांनी सांगितले. ते म्हणाले की, त्याला इथल्या काही कर्मचार्‍यांमुळे टेन्शन आले होते. ते त्याची उलट ड्युटी लावायचे. ते त्याचा मानसिक छळही करत असत. त्यामुळे तो टेन्शनमध्ये होता, असे भगवान सिंह यांनी सांगितले. चेतनने चुकीचे पाऊल उचलले आहे. त्याने असे करायला नको होते, असेही ते म्हणाले.

मानसिकदृष्ट्या अस्वस्थ असूनही शस्त्रे का दिली : चेतनच्या काकांनी अधिकाऱ्यांवर आरोप केले आहेत. चेतन मानसिकदृष्ट्या तंदुरुस्त नसल्याचे अधिकाऱ्यांना दिसले नाही का? त्यांना सगळे माहीत असूनही त्यांनी त्याला शस्त्रे का दिली? असे सवाल त्यांनी उपस्थित केले. त्यांनी सांगितले की, चेतनचे वडील रतलाममध्ये आरपीएफमध्ये काम करायचे. 2007 मध्ये हृदयविकाराच्या झटक्याने त्यांचे निधन झाले. त्याच्या मृत्यूनंतर चेतनला 2009 मध्ये नोकरी मिळाली. चेतनला एक मुलगा आणि एक मुलगी असून ते मथुरेत आईसोबत राहतात.

घटनेत चार जणांचा मृत्यू : सोमवारी पहाटे 5.30 च्या सुमारास आरपीएफ जवान चेतन आणि एएसआय तिलकराम दोघे मुंबई-जयपूर एक्स्प्रेसच्या कोच क्रमांक बी-5 मध्ये प्रवास करत असताना चेतनने प्रवास करत असलेल्या एएसआयवर अचानक गोळीबार केला. यानंतर प्रवाशांमध्ये एकच खळबळ उडाली. या घटनेत चार जणांचा मृत्यू झाला आहे.

हेही वाचा :

  1. Jaipur to Mumbai Train firing : जयपूर-मुंबई रेल्वेत नेमका गोळीबार कसा झाला? रेल्वेच्या अधिकाऱ्यांनी दिली 'ही' माहिती
  2. Jaipur Mumbai Train firing : आरोपी आरपीएफ जवानाला आज तीन वाजता न्यायालयात करण्यात येणार हजर, गोळीबाराचे काय आहे प्रकरण?
Last Updated : Jul 31, 2023, 5:29 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details