देहराडून :उत्तराखंडच्या हरिद्वारमध्ये असलेल्या कुंभ मेळ्यातील बैरागी कॅम्प परिसरात आज (बुधवार) दुपारच्या सुमारास मोठी आग लागली. या परिसरात झोपड्या असल्यामुळे ही आग वेगाने पसरत आहे. आगीची माहिती मिळताच अग्निशामक दलाची एक गाडी तातडीने घटनास्थळी दाखल झाली. तसेच, प्रशासनाने ६० पोलिसांना याठिकाणी पाठवले आहे.
हरिद्वारमधील कुंभमेळा परिसरात आग; अग्नीशामन दलाच्या गाड्यांना पाचारण - कुंभमेळा परिसर आग
याठिकाणी हवेचा वेग जास्त असल्यामुळे ही आग वेगाने पसरत असून, अग्नीशामक दलाच्या आणखी गाड्यांना बोलावण्यात आले आहे. घटनास्थळी अपर मेलाधिकारी ललित नारायण मिश्रा यांच्यासह जिल्हा प्रशासनाचे इतर अधिकारी उपस्थित आहेत. स्थानिकांनी दिलेल्या माहितीनुसार, एका झोपडीत असलेल्या दोन सिलिंडरांमुळे ही आग लागली होती...
हरिद्वारमधील कुंभमेळा परिसरात आग; अग्नीशामन दलाच्या गाड्यांना पाचारण
याठिकाणी हवेचा वेग जास्त असल्यामुळे ही आग वेगाने पसरत असून, अग्नीशामक दलाच्या आणखी गाड्यांना बोलावण्यात आले आहे. घटनास्थळी अपर मेलाधिकारी ललित नारायण मिश्रा यांच्यासह जिल्हा प्रशासनाचे इतर अधिकारी उपस्थित आहेत. स्थानिकांनी दिलेल्या माहितीनुसार, एका झोपडीत असलेल्या दोन सिलिंडरांमुळे ही आग लागली होती.